Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.11 : आज 348 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 40 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा कुठल्याही रुग्णांंचा मृत्यू झाला नाही.आजची कोरोना संदर्भात आकडेवारी पाहता जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
तसेच जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 161 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -160 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.तर आज 116 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आल्या रुग्णांंमध्ये
1)वर्धा 26(पुरुष 13 महिला 13)
2 ) देवळी 1( महिला 1)
3) आर्वी 3 (पुरुष 2 महिला 1)
4) आष्टी 2 (पुरुष 1 महिला 1 )
5) कारंजा 1(महिला 1)
6)हिंगणघाट 5 (पुरुष 1 महिला 4
7) समुद्रपूर 2 (महिला 2 ) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने 41065 असून यामध्ये 41046 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 35135 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 19 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 5411 झाली असून यामध्ये एकूण 3386 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात एकूण 1864 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 77167 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 152 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 283 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण 493 व्यक्ती आहे.
बातमी जरी दिलासादायक असली तरी नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements
विश्वभारत News Website