कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात संताजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बंडू वैरागडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रा.राजेश गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूर अध्यक्ष शंकरराव नागपुरे,कार्याध्यक्ष बां.स. विक्रम येरणे,सचिव नत्थुजी शेंडे,तुषार कलोडे,नगरसेवक अरविंद मेश्राम,राहूल उमरे,कोवन कातकर,प्रा.मंगेश करंबे,राजू मुळे,दीपक वरभे,विवेक येरणे,प्रा.अनील मेहरकुरे,बंडू रागीट,राजेश देवगडे,तुषार बावणे,नागेश बावणे,अनंत येरणे यांनी परिश्रम घेतले.यावेळी प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.