Breaking News

महामंडळाच्या हिरकणी बसचे हाल बेहाल ; महागडी तिकीट परंतु खटारा हिरकणीने प्रवाशियांचे होत आहे हाल

Advertisements
वर्धा :जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- एसटी महामंडळाच्या वर्धा नागपूर महामार्गावर चालत असलेल्या हिरकणी क्र. एम एच १४ बीटी ५०२३ क्रमांकाच्या बसचे हाल अत्यंत बेहाल असून संपुर्ण बसचे टपरे वाजतात तसेच सिटांचे पण अत्यंत वाईट अवस्था आहे.आणी वर्धा नागपूर महामंडळाच्या इतर बसने प्रवास केल्यास टिकत दर जवळपास १००   इतके आहे.परंतु महामंडळाच्या हिरकणीचे दर ३० पटीने जास्त, वर्धा नागपूर प्रवासासाठी तब्बल १३० रुपये प्रवाशांना वर्धा नागपूर प्रवासासाठी मोजावे लागतात तरीही बसची अवस्था अत्यंत खटारा आहे.महामंडळाच्या सदर हिरकिणी बसच्या अश्या अवस्थेसाठी प्रवाशांकडून ओरड होत आहे. सदर बसच्या प्रवास तिकीट महागडा असून सुद्धा महामंडळाकडून अशी खटारा सेवा दिल्या जाते.महामंडळाने अश्या बसची त्वरित सुधारणा करूनच बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करावी अथवा अश्या बसेस महामार्गावर जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट करू नये अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.आता महामंडळ अश्या बसची केव्हा सुधारणा करून बस प्रवाशांच्या सेवेत आणतात की अश्याच खटारा बस चालवून व जादा तिकीट आकारून अशीच प्रवाशांची लूट करतात या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *