वर्धा, दि 31:- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज वर्धा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जयंश गोकुल व्यास या बालकास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे हस्ते तर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे यांचे हस्ते बालकांना पोलिओचा डोस देऊन करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास राज्यस्तरीय निरीक्षक नागपूरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्रिराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे, माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ. प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, लॉयन्स मेडिकोजचे अध्यक्ष डॉ. प्रविण धाकटे, बालरोग तज्ञ डॉ.संजय गाठे उपस्थित होते.
सदर मोहिमेकरीता जिल्हयात १३४१ लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली असुन यामध्ये ग्रामीण भागात ११३५ तर शहरी क्षेत्रात २०६ केंद्रे आहेत. या मोहीमेत एकुण ३२५० कर्मचारी व २६९ पर्यवेक्षक कार्यरत आहेत. यावर्षी ग्रामीण भागातील ७९ हजार २०० लाभार्थीना व शहरी भागातील ३० हजार १३१ असे एकुण १ लक्ष ९ हजार ३३१ लाभार्थ्यांना पोलीओचा डोज पाजण्यात येत आहे. याशिवाय टोल नाके, बस स्टॅड, रल्वे स्टेशन ईत्यादी ठीकाणी ८६ ट्रान्झीट टिम्स लावण्यात आल्यात. ९४ मोबाईल टिम्सव्दारे विट भट्या,ऊस तोडणारे कामगार ईत्यादी भटक्या कुटुंबातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजण्यात येत आहे.
मोहिमेस विस्तार अधिकारी विजय जांगडे, भारती फुनसे,मेट्रन, श्रीमती सविता खुजे, पिएचएन, विवेक दौड, पिएचएन, श्रीमती वलगावकर, श्रीमती खंडाते, स्टॉप नर्स, श्री नाना सुरकार, सामाजिक कार्यकर्ता यांनी सहकार्य केले.