Advertisements
माणिकगड कंपनीने आदिवासींचा छळ थांबवावा,अंत पाहू नये.
कोरपना(ता.प्र):-
गडचांदूर शहरात स्थित माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाने कुसुंबी येथील आदिवासी, कोलाम कुटुंबा विरूद्ध मनमानी धोरण अवलंबुन सातत्याने अन्याय,अत्याचार
करून वेठीस धरले आहे.अन्याय असह्य होत असून याविरोधात कमालीची चिड निर्माण होत आहे. आतातरी या गोरगरीब आदिवासी, कोलामांचा छळ थांबवावा,अंत पाहु नका,अशी संतप्त भावना व्यक्त होत असून बळजबरीने शेती नष्ट करून चुनखडीचे उत्खनन करीत फसवणुक व जमीनीवर कब्जा केल्याबद्दल राजूरा तालुक्यातील बांबेझरी येथील चिन्नु मुक्का आत्राम व मुलगा कच्चू चिन्नु आत्राम यांनी ५ मार्च रोजी मा

णिकगड कंपनी प्रशासन विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशनात लेखी तक्रार दाखल केली आहे.
Advertisements
सविस्तर असे की,तक्रारदार आत्राम यांच्या मालकी व पट्ट्याची शेत स.नं.४४ व ४५ ची १ हेक्टर ९८ आर शेत जमीन मौजा बांबेझरी येथे होती.कुसुंबी माईन्स मध्ये जमीनीचा ६४३.६२ हेक्टर आर जमीनीचा भूपृष्ठ अधिकार १७ आगस्ट १९८१ रोजी शासनाने माणिकगड सिमेंट कुसुंबी माईन्स मध्ये चुनखडी उत्खननासाठी दिला.यात नोकारी व कुसुंबी शिवारातील जमीन असून मौजा बांबेझरी येथील जमीन शासनाने किंवा शेतकऱ्यांनी कंपनीला संमतीने दिली नसताना मंजूर क्षेत्राच्या बाहेर बळजबरी व मुजोरीने पोकलँड,जेसीबीचा वापर करून ब्लास्टिंगद्वारे शेती उध्वस्त करत चुनखडीचे उत्खनन केले. सदर व्यक्ती कोलाम,आदिवासी समाजाचे माहीत असताना वरील गैर अर्जदारांच्या मनमानीने शेती उध्वस्त करून कब्जा केल्याची बाब अर्जदार आत्राम यांनी तक्रारीत नमूद केली आहे.
याबाबत आत्राम यांनी न्याय हक्कासाठी कंपनीकडे चकरा मारल्या मात्र प्रतिसाद दिला नसून सदर जमीन शासनाची
परवानगी जमीन हस्तांतर व कब्जा घेण्याबद्दल कायदेशीर अधिकार नसताना जमीन अधिग्रहण व जमीन मोबदला,नोकरी यापैकी कोणतेच लाभ दिले नाही.शासनाची दिशाभूल करत लबाडीने जमीनीवर चुनखडीचे उत्खनन करून फसगत करीत कुटुंब उध्वस्त केल्याचे आरोप करत माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून आज मला व माझ्या कुटुंबापुढे आत्महत्या शिवाय दुसरे पर्याय उरलेला नाही. अशी खंत आत्राम यांनी तक्रारी व्यक्त केली आहे.यामुळे अन्याय अत्याचार करत सर्व्हे नं.४५ शेत नकाशात माईन्स अशी नोंद घेऊन माझ्या शेतातील चुनखडीचे उत्खननाची चोरी केली.यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबावर अन्याय करून सदर कंपनीने माझी सोन्या सारखी जमीन बळकावली.याकरीता प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अनुसूचित जाती जमाती कुटुंबावर अन्याय,अत्याचार व शोषण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती आत्राम यांनी ठाणेदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.
————-//————-
या कंपनीने बांबेझरीच्या आदिवासींच्या जागा हडप केल्या तरी शासनप्रशासन गप्प बसतो,पोलीस गप्प बसतो मग यांनी न्याय मागायचा कुणाला? म्हणून आमची मागणी आहे की,कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करावा,अँट्रसिटी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी,ज्या आदिवासींचा शोषण केला,ज्यांच्या जमीनी गेल्या त्यांना मोबदला द्यावा,नोकरी द्यावी,आता यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून ते कोणतीही टोकेची भुमिका घेऊ शकतात याची जाण प्रशासनाने ठेवावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयपुढे ” अर्धनग्न” आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे.आणि पोलिसांनी या कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल केला नाही तर येत्या ८ दिवसात संपूर्ण कोलाम आदिवासी जिल्हाधिकारी यांच्या समोर जाऊन “आत्मदहना
चा” इशारा देणार आहे.
Advertisements
“सैय्यद आबीद अली”
अध्यक्ष जनसत्याग्रह संघटना तथा राकाँ नेते”
Advertisements