Breaking News

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही।

Advertisements
अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही।
सविस्तर वृत्त असे की जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वर्धा श्रीमती माधुरी भोयर यांनी आज सकाळी 10 वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुका येथील तरोडा या गावी होत असल्याची माहिती श्री. अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती यांना दिली, श्री. अजय डबले यांनी तात्काळ दखल घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करून पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथे भेट देऊन तेथील पोलिस निरीक्षक यांना सदर घटनेचे गांभीर्य  त्यांच्या लक्षात आणून दिले व सोबतच 3 पोलीस कर्मचारी यांना घेऊन वाहनाने विवाह स्थळ गाठले, सदर ठिकाणी शुभमंगल गाथा चालू होती, वेळीच तेथे हस्तक्षेप करून ते थांबविले, व गावातील सरपंच, पोलीस पाटील , अंगणवाडी सेविका यांना सदर ठिकाणी बोलविण्यात आले, त्यांना प्रथमतः सदर विवाह हा बालविवाह आहे, बालविवाह प्रतिबंध कायद्या अन्वये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, अन्यथा तो बालविवाह ठरतो अशी माहिती देण्यात आली व तेथील वधू ,वर, त्यांचे नातेवाईक, गावकरी यांची समजूत काढण्यात आली, सदर विवाहाला स्थगिती देऊन वधू वर, नातेवाईक यांना बाल कल्याण समिती समोर हजर करणे आवश्यक आहे अशी माहिती दिली व सर्वाना सोबत घेऊन बाल कल्याण समिती अमरावती यांच्या समोर हजर करण्यात आले, बाल कल्याण समिती सदस्या श्रीमती मीना दंढले, श्रीमती अंजली घुलक्षे यांच्या समक्ष वधू वर , नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचा जबाब/ हमीपत्र लिहून घेण्यात आले व सदर बालिकेला दर 15 दिवसांनी बाल कल्याण समिती समक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, सदर कार्यवाही श्री अतुल bhadange जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती, मनीषा फुलाडी सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी यांच्या कडून करण्यात आली, व एका अल्पवयीन बलिकेचा बालविवाह थांबविण्यात आला. महिला व बाल विकास अधिकारी श्री. सुनील मेसरे यांच्या आदेशनव्ये बाल विवाह थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर प्रकरणात मोलाची भूमिका बजावली.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक : पती-पत्नीचा जागीच मृत्यू

वर्धा येथून नागपूरकडे भरधाव येत असलेल्या कारने रस्त्यालगत उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. पती-पत्नीचा घटनास्थळीच …

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *