Breaking News

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन,बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर* चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या कार्याचा आदर्श जनसामान्यांपुढे ठेवावा अशी भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या सत्याग्रह आंदोलनास भेट देवून या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी सांगितले की महसुल विभागाच्या जागेवर पुतळा उभारण्यास रितसर अनुमती देण्यात येत असतांना बिरसा मुंडांच्या पुतळयाबाबत प्रशासनाने घेतलेली भुमिका अतार्कीक स्वरूपाची आहे. कारण बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी बांधवांचेच पुज्यनीय व्यक्तीमत्व नसुन ते सर्वांनाच पुज्य आहेत अशा देशभर पुज्यनीय असलेल्या महापुरूषांचा पुतळा हटविण्याची चुक सुधारण्याची आवश्यकता आहे. भारतीय संसदेमध्ये आदर्श असलेल्या महापुरूषांपैकी एक असलेल्या बिरसा मुंडाचाही पुतळा उभारल्या गेला आहे याचे भान ठेवून प्रशासनाने अशी घातकी कृती करायला नको होती असेही ते म्हणाले. सत्याग्रहाला बसलेल्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे लाखोचा जनसमुदाय आहे याची जाण ठेवून या बांधवांचा आणखी अंत न पाहता समितीच्या पदाधिकाÚयांसोबत विशेष बैठक आयोजित करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखत भगवान मुंडांच्या पुतळ्याची पूनस्र्थापना करून सुरू असलेले सत्याग्रह सोडविण्याची भुमिका जिल्हा प्रशासनाने स्वीकारावी असे आवाहनही अहीर यांनी केले. यावेळी त्यांनी समितीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या रास्त मागणीस पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रा. अशोक तुमराम, विलास मसराम व अन्य प्रभृती याप्रसंगी उपस्थित होते.

Advertisements

*जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन*
 *बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर*
चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या कार्याचा आदर्श जनसामान्यांपुढे ठेवावा अशी भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या सत्याग्रह आंदोलनास भेट देवून या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी सांगितले की महसुल विभागाच्या जागेवर पुतळा उभारण्यास रितसर अनुमती देण्यात येत असतांना बिरसा मुंडांच्या पुतळयाबाबत प्रशासनाने घेतलेली भुमिका अतार्कीक स्वरूपाची आहे. कारण बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी बांधवांचेच पुज्यनीय व्यक्तीमत्व नसुन ते सर्वांनाच पुज्य आहेत अशा देशभर पुज्यनीय असलेल्या महापुरूषांचा पुतळा हटविण्याची चुक सुधारण्याची आवश्यकता आहे. भारतीय संसदेमध्ये आदर्श असलेल्या महापुरूषांपैकी एक असलेल्या बिरसा मुंडाचाही पुतळा उभारल्या गेला आहे याचे भान ठेवून प्रशासनाने अशी घातकी कृती करायला नको होती असेही ते म्हणाले.
सत्याग्रहाला बसलेल्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे लाखोचा जनसमुदाय आहे याची जाण ठेवून या बांधवांचा आणखी अंत न पाहता समितीच्या पदाधिकाÚयांसोबत विशेष बैठक आयोजित करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखत भगवान मुंडांच्या पुतळ्याची पूनस्र्थापना करून सुरू असलेले सत्याग्रह सोडविण्याची भुमिका जिल्हा प्रशासनाने स्वीकारावी असे आवाहनही अहीर यांनी केले. यावेळी त्यांनी समितीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या रास्त मागणीस पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रा. अशोक तुमराम, विलास मसराम व अन्य प्रभृती याप्रसंगी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *