Breaking News

पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.

Advertisements
पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.
तुम्ही सर्कस पहिली असेलच, सर्कस मध्ये वाघ,सिंह हिंसप्राणी सर्वात जास्त रिंग मास्टरला घाबरतो.तसेच समाजात आणि पक्ष संघटना,ट्रेंड युनियन मध्ये असते. जे समाजाचे लोक,पक्ष संघटनेचे सभासद, ट्रेंड युनियनचे कामगार नेत्याला डोक्यावर घेऊन नाचतात ते लोक चुकीचे काम केल्यास पाया खाली तुडवायला कमी करीत नाही. म्हणजे सिंह वाघ हिंस प्राणी आहेत, त्यावर स्वार असे पर्यत ते स्वराला खाऊ शकत नाही. आमदार,खासदार मंत्री असे पर्यत एक दरारा असतो. कार्यकाळ संपला की कोणी नमस्कार सुद्धा घालत नाही.कारण पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.तसाच तो सिंहावर बसलेला स्वार सुध्दा असतो.
कोणत्याही माणसाचे महत्व “पद” मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही,तो त्या “पदाला” किती न्याय देतो तो किती कार्यक्षम,कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो.पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि  “पद”  मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो, “पदामुळे” तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, “पदामुळे” आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, “पद” कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे,असे संघटनेत समाजातील माणसांसोबत वागले पाहिजे.म्हणूनच पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो हे कायम लक्षात घेऊन किर्याशील राहिले पाहिजे.
नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो. की रात्र दिवस तुम्ही शांत झोपुच शकत नाही. तिथे तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा,तरच लोक तुमच्या व संघटनेच्या सोबत राहतील.        
कार्यकर्ता नेता बनतो तेव्हा तो संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित असला पाहिजे. कारण रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे माहीती असूनही त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असते. म्हणूनच संघटनेचे कार्य मिशनरी पध्दतीने केले पाहिजे.त्यात निष्ठा,त्याग जिद्द पहिल्या पेक्षा जास्त असली पाहिजे.अन्यता संघटना व नेतृत्व जास्त दिवस टिकत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्युनिसिपल कामगार संघ, मुंबईचे अध्यक्ष म्हणून संघाच्या सर्वसाधारण सभेत दि.१३ जुलै १९४१ ला दिलेले भाषण आणि मजूर केलेल्या ठरावाचे वाचन आज केले तर अनेक समस्या दुर्लक्षित आहेत.सफाई कामगारांच्या मुत्युनंतर डिग्री होल्डर असलेल्या मुलांना सफाई कामगार म्हणूनच नोकरीवर ठेवल्या जात असेल तर आपण संघटना कशासाठी चालवितो?. यांचा विचार कामगार कर्मचाऱ्यांनी करून युनियन,संघटनेचे कार्य मिशनरी पध्दतीने केले पाहिजे असे सांगितले होते.हे किती कार्यकर्त्याने समजुन घेऊन अंमलबजावणी केली?.
 आज अनेक नेते सभागृहात किंवा जाहीर सभेत वाटेल ते बोलून टाळ्या वाजवून घेण्यासाठी भाषण करतात.पण मुख्य मुद्द्यावर बोलत नाही. समस्यावर उपाय योजना सांगत नाही. आपण कुठे आहोत आणि काय बोलतो यांचे भान नसणाऱ्या नेत्यांचे संघटना युनियन,पक्ष समाजाला काय न्याय मिळवून देणार?. नेत्यांची भाषण करण्याची पद्धत कशी असावी, तर मुद्द्यावर भर देऊन ते सोडविण्यासाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे यांचा आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार चळवळीला दिला आहे तो आपण डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास आपण राष्ट्रीय ट्रेंड युनियनचा दर्जा प्राप्त करून घेऊ शकतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ जुलै १९४१ म्युनिसिपल कामगार संघाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत सांगितले होते.ते फक्त सफाई कामगारांना नी तर देशातील तमाम कामगार,कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. यांची जाणीव सफाई कामगारांना आज ही नाही.
मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे ५-६ राज्यांच्या बजेट पेक्षाही मोठे आहे कामगार कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतल्यास व या संघटनेमुळे आपण झोपडपट्टीतील आपल्या बहुजन समाजाच्या प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहचू शकतो याची जाणीव कामगार कर्मचाऱ्यांनी ठेवावी. कारण कामगार,कर्मचारी हा देशाती बहुसंख्येने असलेला मतदार आहे.कोणत्याही मतदारसंघात कामगार संघटनेचे कार्य हे लक्षवेधी असले पाहिजे ते काम पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्यांचे असते. म्हणूनच पद हे शोभेची वस्तू नाही.समाजाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला,क्रीडासह सर्व क्षेत्रातील कार्यक्रमाद्वारे लोकांना जोडण्यासाठी काम करण्याची जबाबदारी असते.
मुंबईत शिवसेनेशी गल्ली बोळातील तरुण मित्र मंडळ जोडल्या गेले आहेत. सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा आयोजित करून ते समाजाला एकत्र करीत असतात.त्यामुळेच त्यांची कामगार संघटना  मुंबई महानगरपालिका, बेस्ट,रिक्षा,पेट्रोल पंप आणि हॉटेलमध्ये सुद्धा स्वतःची भारतीय कामगार सेना राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.गट प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख या पदावर असणारे शिवसैनिक नगरसेवक, नंतर आमदार नंतर खासदार झाले.तरी ते मतदार असलेल्या समाजाशी कायमस्वरूपी जोडलेले असतात.त्यांचे लक्ष कामगार कर्मचारी यांच्यावर असते.पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.तसेच पद म्हणजे सिंहाचा पाठीवर स्वार होणे असते!.जे पदासाठी काम करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत.पण जे ध्येय, उद्धिष्ट गाठण्यासाठी काम करतात ते कायमस्वरूपी संघटनेशी जुळून राहतात.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कायमस्वरूपी कोणत्याही संघटनेशी जुळून राहत नाही.घरी व समाजात वावरताना कट्टर जयभिम वाले बौद्ध!.आणि कामावर कामगार,कर्मचारी म्हणून भाजप शिवसेना प्रणित कामगार संघटना,युनियनचे कट्टर समर्थक. यांनी आपले किंवा आपल्या विचारधारेशी कायम पदासाठी गद्दारीच केली असते.कामगार कर्मचारी, मतदार आणि समाज बांधव तीन वेगवेगळ्या ठिकाणी भूमिका पार पडणारे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होतांना दिसत नाही.पद प्रतिष्ठा विकत मिळविता येते नाही.त्यासाठी निष्ठा,त्याग आणि जिद्द ठेवावी लागते.
महानगरपालिका,विधानसभा,लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी आंबेडकरी चळवळीतील राजकीय तज्ञ मतदारसंघाची मतदार संख्या जाहीरपणे मांडत असतात. त्यानुसार नगरसेवक, आमदार,खासदार शंभर टक्के निवडून येऊ शकतो असे गणितं मांडत असतात. निवडणुकीच्या निकाला नंतर सर्व बेरीज केली तर ????………एक ना धड भराभर चिंध्या.
मतदार संघातील संख्या बघून त्यांना संघटित करण्यासाठी निवडणूकी अगोदर काय काय कार्यक्रम राबविण्यात आले होते?. नागरी समस्या कशा पद्धतीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला. काय सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या?. कोणत्या पक्ष संघटने द्वारे ?. असेच प्रश्न विचारले जातात.कोणती ही समस्या सोडवण्यासाठी संघटना असणे खूप महत्वाचे असते, संघटित शक्ती कोणत्याही संकटावर मात करू शकते. म्हणूनच कोणत्याही संस्था, संघटना, पक्षात,ट्रेंड युनियन मध्ये पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.त्यांची शान वाढवली पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप मुंबई, 
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *