Breaking News

सावली येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग- लाखोंचे नुकसान

Advertisements

सावली येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग- लाखोंचे नुकसान
सावली-

Advertisements

येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शनिवारी, पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सावली येथील पंचायत समितीसमोर बोरूले यांच्या मालकीचे दुकान होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा व पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान, शॉर्टसक्रिटमुळे दुकानाला आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती होताच गडचिरोली व मूल येथून अग्निशमन दलाला पाचारण केले. पण, अग्निशमन दल वेळेवर पोहचू शकले नाही. त्यामुळे दुकानाची राख रांगोळी झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मागील दोन वर्षापासून सावली शहरात अग्निशमन दलाची मागणी केली जात आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री यांनी थेट पत्रकार परिषदेत अग्निशमन दलाची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, त्यांचे आश्‍वासन हवेत विरले. शहराला अग्निशमन दल केव्हा मिळेल, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *