वरोरा- तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुर्डा शाखेत दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या वेळेस बॅक मॅनेजरची कॅबीन फोडून बॅकेतून जवळपास ६ लाखांची रोकड आणि १० तोळे सोनं लुटल्याची घटना शनिवारी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडालीआहे. तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांच्या विश्वासहर्तवर.ही प्रश्न चिन्हं उभा झाला आहे.
अधिक माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुरडा शाखेत शनिवारी सकाळी बैक कर्मचारी यांनी प्रवेश केला असता शटरचे कुलूप तोडून असल्याचे निदर्शनास आले. बैंकेत तर प्रवेश केला असता बैक व्यवस्थापकाच्या कक्षाच्या बाजूची खिडकी तुटलेली व लॉकरचे शटर ही तुटलेले दिसले. ही माहिती बैक व्यवस्थापकाने वरोरा पोलिसांना दिली.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली. लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले. सिसीटीव्ही केबल, फायर अलार्म, मुख्य अलार्म केबल कापण्यात आले होते. मीटर चे ग्रीफ ही काढून ठेवले होते. व बैकेतील रोकड व जमा सोने लुटण्यात आले. पूर्व नियोजनानुसार हा दरोडा टाकण्यात आल्याचे प्राथमिक अंदाजानुसार दिसून आले. घटनास्थळी पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीच्या आढावा घेतला.या संबंधात बैकेच्या अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक आदिंकडून माहिती घेण्यात येत आहे.
Check Also
नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?
महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …