सिमेंट कंपन्यांनी कामगारांचे लसीकरण स्वत:च्या रुग्णालयात करावे.
(आशिष देरकर यांची मागणी)
कोरपना(ता.प्र.):-
गडचांदूर,नांदाफाटा व उप्परवाही या औद्योगिक क्षेत्रात बाहेरून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कोरपना तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अल्ट्राटेक,अंबुजा व माणिकगड सिमेंट कंपन्यांनी आपल्या स्वतःच्या खासगी रुग्णालयात कंपनीच्या कामगारांचे लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी राजूरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा स्मार्ट ग्राम बिबी उपसरपंच आशिष देरकर यांनी आमदार सुभाष धोटे व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
कोरपना तालुक्याची एकुण लोकसंख्या जवळपास १ लाख ३० हजार असून प्रवाशांची संख्या कमीजास्त ७० हजारांपर्यंत आहे. गडचांदूर,नारंडा व कोरपना अशा एकूण ३ ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था शासनाने केली आहे.याठिकाणी लसीकरणासाठी लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र असून लसीचा फार मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे.लसीकरण सुरू झाल्यापासून कंपन्यांच्या आदेशानुसार कामगारांनी लसीकरणसाठी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे.तसेच कंपन्यांतील सर्व अधिकारी वर्ग सुद्धा शासकीय रुग्णालयात येऊन लस टोचून घेत आहे.अशा परिस्थितीत शहरातील लहानमोठे व्यावसायिक, कामगार,फ्रन्टलाइन वर्कर हे सर्व लस घेत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात प्रचंड गर्दी वाढलेली आहे.
सिमेंट कंपन्यांकडे स्वतःचे सर्व सोयी-सुविधायुक्त रूग्णालय अस्तित्वात आहे. उपलब्ध आहे.त्यांचा वापर या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात योग्य रित्या व्हावा यासाठी कंपन्यांनी स्वतः लसीकरणाची व्यवस्था करावी,लस उपलब्ध होत नसेल तर सीएसआर निधीचा वापर करून लस खरेदी करून कामगारांना द्यावी.जेणेकरून सरकारी रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यास मदत होईल व कोरोना संक्रमण रोखता येईल. त्याकरीता कंपन्यांना आदेशीत करावे,बिबी व खिर्डी येथील उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे. बिबी व खिर्डी येथे प्राथमिक उपकेंद्र असून याठिकाणी लसीकरण सुरू केल्यास आजूबाजूच्या जवळपास १५ ते २० हजार लोकसंख्येला फायदा होईल.नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न झाल्याने सध्या परिस्थितीत बिबी व खिर्डी येथील उपकेंद्रात लसीकरण सुरू करून ग्रामीण रुग्णालयातील गर्दी कमी करावी अशी विनंती सुद्धा आशी मागणी सुद्धा देरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.आता यामागणीला संबंधित कीती गंभीरतेने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.