कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये
अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण
वर्धा, :
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढलेला असून रुग्णालयात भरती होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात पहावयास मिळाले.
कोरोनावरील उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात भरती झालेले आर्वी येथील सुभाष राठी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून हलविल्यानंतर रुग्णकक्षाची स्वच्छता करण्यास गेलेल्या वृंदा चौधरी यांना खाटेवरील उशीखाली १ लाख ६०० रुपयांसह मनगटी घड्याळ, चाव्यांचा गुच्छा आदी वस्तू आढळून आल्या. या वस्तू रुग्ण परिवाराला प्राप्त व्हाव्यात म्हणून वृंदा चौधरी यांनी लगेच रुग्णालय प्रशासनाकडे रकमेसह सोपविल्या. अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात पहावयास मिळाले.
रुग्णालयाने दुसèया दिवशी रक्कम व वस्तू राठी परिवाराच्या सुपूर्द केल्या. अत्यंत विपरीत परिस्थितीतही कर्तव्याचे पालन करणाèया वृंदा चौधरी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून याची दखल घेत संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांनी चौधरी यांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले. संस्थेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी दिलेली निव्र्याज सेवाभावाची शिकवण माझ्यासाठी प्रेरणादायी असून यामुळे आमच्या संस्थेची विश्वसनीयता वाढेल आणि इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल, असे मत वृंदा चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये, अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण
Advertisements
Advertisements
Advertisements