आज रात्री आठ वाजल्यापासून हे नियम लागू होणार आहेत.
एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाणार असाल तर खाजगी गाडीतून जाण्यासाठी तुम्ही अत्यावश्यक सेवेत काम करत असणारे असाल किंवा मेडिकल इमर्जेन्सी असेल तरच तुम्हाला एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाता येईल.
खाजगी बसेस ५० टक्के क्षमतेने चालू राहणार, यामध्ये एका शहरात बसेसना दोन थांबे घेता येणार. थांबलेल्या स्टॉपवर होम कॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात येणार व संबंधित व्यक्तिंना १४ दिवस होम कॉरन्टाईन रहावं लागणार. थोडक्यात खाजगी बसेस मधून आंतरजिल्हा प्रवास केल्यास १४ दिवस होम कॉरन्टाईन व्हावे लागणार.
सरकारी कर्मचारी, वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी, मेडिकल इमर्जन्सी असेल तरच तुम्ही लोकल व मेट्रो वापरू शकता.
आंतरराज्यीय रेल्वे प्रवास करताना महाराष्ट्रात उतरलात तर १४ दिवस कॉरन्टाईन व्हावं लागणार.
सरकारी कार्यालये १५ टक्के क्षमतेनं चालवणार.
लग्न दोन तासात उरकून घ्याव्येत. २५ लोकांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असता कामा नये. (नवरा नवरी देखील या २५ लोकांमध्ये येतात) नाहीतर ५० हजार रुपयांचा दंड.