Breaking News

तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.

Advertisements

तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.

Advertisements
महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी लढणारे मराठी हृदय सम्राट कुठे आहेत?. रेमडीसीविर इंजेक्शन साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात रात्री बारा नंतर उपस्थित राहून पोलिसांवर दबाव आणतात त्याविरोधात कुठेच खल्याळ खटायकआवाज ऐकू आला नाही.मराठी माणसाचे ठेकेदार समजणारे महाराष्ट्राचे मित्र आहेत की शत्रू?.
गात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, पोलिस यंत्रणा, मिडिया, इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहेत.आणि आमच्या देशात कोरोना विरूद्ध लढा फक्त सत्ताधारी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, इतर सेवेकरी, पोलिस यंत्रणा, मिडिया इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोना लढा देत आहेत यांची तुलना केली.तर भाजपा प्रणित राज्यात सत्ताधारी नागरिकांना सेवा देतांना उघड उघड पक्षभेद जातीभेदाच्या नांवावर भेदभाव दाखवीत आहे. आणि त्या विरोधात केंद्र व राज्यातील विरोधीपक्ष याविरोधात बोलतो तेव्हा तो देशद्रोही ठरत आहे.
महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्ष फक्त आणि फक्त –असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहे.सनदशीर मार्गाने जन आंदोलने करण्याचा सर्वात मोठा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. परंतु रात्री बारा नंतर कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस प्रशासनावर दबाव आणू शकत नाही.उत्तर प्रदेशातील हाथरत आणि मुंबईतील बी के सी पोलीस काही फरक आहे की नाही. सर्वच ठिकाणी मनुवादी मानसिकता असलेले पोलीस प्रशासन आहे की काय?.
 
देश राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं आजच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां कळत नाही हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे.त्यांच्या समरणार्थ मराठा,माधव, ओबीसी आपसात एकमेकांवर हल्ले करीत आहेत. हे त्याहीपेक्षा मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. त्याला प्रिंट मीडिया वृत्तवाहिन्या ही पक्षपाती प्रसिद्धी देतांना दिसतात.जे उघडया डोळ्याने दिसते ते सत्य दाखविणे आणि सांगणे हे त्यांचे काम असते.त्यामुळेच प्रसार माध्यमावरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
 
कोरोना गरिब,श्रीमंत,उद्योगपती,सत्ताधारी पक्षाचे नेते,विरोधी पक्षनेते वगैरे असा भेदभाव करत नाही. कोरोनाची लागण कोणालाही व कधीही होऊ शकते. तेव्हा विरोधी पक्षनेत्यांना एकच हात जोडून विनंती आहे की, तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी एकत्र येऊन काम करा.राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला पायदळी तुडविल्या शिवाय राहणार नाही.आज तुम्ही जे जे काम कराल त्यांचा इतिहास लिहला जाणार आहे.आणि जगातील विचारवंत त्यांची बारकाईने नोंदी करून ठेवतात.सर्वच लिहणारे तुमचे मनुवादी नसणार आम्ही आंबेडकरवादी आता भीडभाड न ठेवता लिहायला लागलो.हा इतिहास लक्षात असु द्या.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून जगात ओळखल्या जातो.त्यांचा ऐतिहासिक म्हणी त्या त्या देशात प्रसिद्ध आहेत.नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन मतदारांना मतदान मांगीतले होते.म्हणत होता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?. 
जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही  आम्ही राज्य केले असते !” — लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.  यांचे जग प्रसिद्ध वाक्य आहे. भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजान प्रमाणे लढा!.— नेताजी सुभाषचंद्र बोस.म्हणत होते. नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजाच्या इतिहासाची गरज आहे.असे ऑडॉल्फ  (अडॉल्फ) हिटलर सांगत होता.   
शिवाजी महाराज हे फक्त नांव नाही, तर शिवाजी  महाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे. जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !.— स्वामी विवेकानंद. जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते ! — बराक ओबामा, अमेरिका. जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !.— इंग्रज गव्हर्नर यांनी त्यांच्या नोंद वहीत लिहून ठेवले.
काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया?   सिवा भोसला जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है . — औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर) उस दिन सिवा भोसला” ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता.— शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.
क्या उस गद्दारे दख्खन से सिवा नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !.— बडी बेगम अलि आदिलशाह.
१७ व्या शतकात युरोप खंडात “लंडन गॅझेट” नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला.महाराष्ट्राचा आजचा राजकीय सत्ता संघर्ष समजून घ्याचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील.त्यासाठी कॉम्रेड शरद पाटील यांचे शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण?.हा ऐतिहासिकदृष्ट्या संदर्भ ग्रंथ वाचवा लागेल.
वरील उदाहरणावरून आम्ही आंबेडकरी,सत्यशोधक चळवळीचे लोक नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच, महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते.
ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता.प्रति औरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झालेपरिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता.
बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते.   दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता. महाराजांनी याचा पराभव केला.सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते. महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं.
उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा, या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव(१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा इतिहास मराठा,ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने वाचला नाही.आणि ज्यांनी वाचला त्यांनी सांगितला नाही.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या कडून खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. पण हजारो वर्षाची मानसिकता बदलायला वेळ लागणार आहेच.म्हणूनच पेशव्यांचे वारसदार फडणवीस डोके वर काढत आहे.   
 
महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या खांद्यावर उभा राहून भाजपा मोठा झाला.भाजपानी फडणवीस मोठा केला. आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही.त्याचं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला ही राहिला नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणून कोरोनाच्या महामारीत नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा,सहकार्य मदतीची गरज असतांना वैचारिक, सामाजिक,राजकीय पक्षभेद,जातीभेद, प्रांतभेद निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षनेते करीत आहेत. त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होतो.तड फडणवीस त्यांचा पक्ष महाराष्ट्राचा मित्र की शत्रु?.त्यावर जे जे स्वतःला मराठी व महाराष्ट्र राज्याचे हितरक्षक समजतात आणि संकटात सापडल्यावर जात पाहून बोलतात त्यांनाही मराठी माणसाने ओळखले पाहिजे.
 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांचे निधन

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद वसंतराव कुमरे यांचे आज, सोमवारी निधन झाले. ते 48 …

राज ठाकरे सोडणार PM मोदीची साथ? वाचा

२०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणाऱ्या मनसेनं या निवडणुकीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *