Breaking News

क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

Advertisements

क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना
चंद्रपूर-
बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील तसेच बल्लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता विसापूर नजिकच्या भिवकुंड येथील समाजकल्याण विभागाच्या नव्या इमारतीत 60 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय उभारण्यात यावेत. यात 40 प्राणवायू खाटा, तर 20 साध्या खाटा असाव्या, त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या 50 खाटांच्या कोविड केअर केंद्राची क्षमता वाढवून 130 करण्यात यावी, अशा सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
बल्लारपूर तालुका क्रिडा संकुलात जम्बो कोविड रूग्णालय सुरू करण्यात यावे, यात 70 प्राणवायू खाटा आणि 80 साध्या खाटा असाव्या, असेही ते म्हणाले. सोमवार, 26 एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भिवकुंड परिसरात डीसीएचसी रूग्णालय व जम्बो कोविड रूग्णालयासाठी जागेची पाहणी केली. यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते निलेश खरबडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, तहसीलदार संजय राईंचवार, तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.या पाहणी दौर्‍यादरम्यान आ. मुनगंटीवार यांनी कोविड केअर सेंटर हे 130 क्षमतेचे करावे, अशा सुचना दिल्या. येथे येणार्‍या रूग्णांना उत्तम सुविधा उपलब्ध करण्यावर भर देतानाच भोजनाची सोय ही अत्युत्तम असावी, असेही ते म्हणाले.
बल्लारपूर येथे हवेतून प्राणवायू घेणारा संच उभारण्याबाबत आपण सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, जिल्हाधिकार्यांनासुध्दा त्यादृष्टीने अवगत केल्याचे त्यांनी सांगितले. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता तालुका क्रिडा संकुल बल्लारपूर येथे जम्बो कोविड रूग्णालय उभारण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. या भागातील रूग्णांसाठी 60 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय प्रस्तावित असून, हे रूग्णालयसुध्दा लवकरच मंजुर होईल यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. डीसीएचसी रूग्णालय असो वा जम्बो कोविड रूग्णालय उपकरणे, यंत्रसामुग्री आदी बाबी उत्तम व दर्जेदार असाव्या, याकडे विशेष लक्ष देण्याबाबत त्यांनी यावेळी सुचित केले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *