Breaking News

आयसीआयसीआय बँकेकडून मनपाला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

Advertisements
चंद्रपूर, ता. १० : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात चंद्रपूर शहरातील नागरिक सापडलेआहेत. रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगर पालिकेला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पीपीई किट भेट दिली.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी (ता. १०) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने ही भेट मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की, सत्तापक्षनेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, उपायुक्त विशाल वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल खंडारे, आयसीआयसीआय बँकेचे वैभव माकोडे, विवेक चौधरी, श्रीकांत ठाकूर आदी उपस्थित होते.
झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गासोबत ऑक्सिजची मागणी प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासतोय. ही उणीव भरून काढण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली आहे. या शिवाय गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. ती लवकरच महापालिकेला सुपूर्द करण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना रुगांना मदत व्हावी, यासाठी आणखी सहकार्य करू, असे आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की यांनी सांगीतले. सीएसआर फंडातून केलेल्या मदतीबद्दल चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने महापौर राखी संजय कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी आयसीआयसीआय बँकेचे आभार मानले.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *