लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा- खासदार रामदास तडस
- मतदारसंघातील समस्येबाबत आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे वेधले लक्ष
- 18 – 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केली मागणी.
वर्धा: वर्धा जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरु असुन कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना कोविशील्ड दुसरा डोस मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेले अनेक नागरिक दुस-या लसीची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करीत आहेत, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस 28 ते 42 दिवसांच्या दरम्यान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, परंतु नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस अजुन पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे तसेच 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी 1 मे पासून सुरवात झालेली आहे. या वयोगटाकरिता प्राधान्याने अतिरीक्त लसीकरण केन्द्र मंजुर करुन लसीकरण गरजेचे आहे याबाबत योग्य कार्यवाही करण्याबाबतची विनंती वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे व विरोधी पक्षेनेते श्री. देवेन्द्र फडणवीस यांना विनंती केली.
जिल्हयात कोविड-19 बाधीतांची दिवसेदिवस वाढत आहे, याला अटकाव करण्याकरिता कोविड-19 लस प्रभावी आहे. जिल्हयात लसीकरण मोहिम सुरु आहे परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहे. नागरिकांनी कुठल्याही कंपनीचा लसिकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस हा वेळेतच उपलब्ध करून देणे हा योग्य नियोजनाचा भाग असून एकही नागरिक दुस-या डोस पासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला पाहीजे, तसेच 18 – 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी गरज असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.