Breaking News

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ?

Advertisements
आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ?
*गेले वर्षभरापासून जनता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न करत आहेत.कोरोनाचा तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संगीत

 

 खुर्चीचा खेळ सुरूच आहे.कोरोनाने इतकं अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे की, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी सूचना आणि आदेश दिल्यामुळे ते टाळून आपला जीव वाचवण्यासाठी लोक आपापली उद्योग व्यवसाय बंद करून कुलुपबंद झाली तरी कोरोना लोकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. घरबसल्या सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि वैद्यकीय पत्थ पाळणा-यांनाही तो किडा कवटाळायचे सोडत नाही. तेव्हां गर्दीमुळेच होतो यावरून लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे.याला पुष्टी मिळण्याचे महत्वाचे कारण म्हणजे मागील सप्ताहात आसाम आणि बंगालमध्ये कुठल्याही प्रकारची मुखपट्टी न बांधता लाखो लोकांनी एकाचवेळी मोदींच्या समोर मुंग्यांसारखी केलेली गर्दी होत.असो !*
*आता तर परिस्थिती इतकी भयावह होत आहे की,लोक योग्य उपचारांअभावी जीव सोडत आहेत. लोकांना बेडची कमतरता असल्यामुळे उपचारासाठी इस्पितळं कमी पडत आहेत. यदाकदाचित इस्पितळात दाखल करता आलेच तर औषधं आणि प्राणवायूंच्या कुपींचा तुटवडा भासत आहे.अतिनाजूक अवस्थेत लावण्याची जीवरक्षक यंत्रेही उपल्बध नसल्यामुळे मृत्युशिवाय अन्य मार्गच उरत नाही.एकीकडे हा सगळा सावळागोंधळ सुरू असताना दुसरीकडे एखाद्या जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना लोकांच्या जशा रांगा लागलेल्या असतात तशा जागा आणि वेळेची वाट पाहत स्मशानासमोर रांगा लागल्याचे हृदयद्रावक दृश्ये दिसत आहेत. तिथेही लोकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी हडप करणारी टोळी दाह संस्कारांचा काळा बाजार करत ठाण मांडून बसले आहेत. काही जणांची आपला नंबर लागेपर्यंत प्रतिक्षा करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता नाही असे लोक आपल्या आप्तेष्टांच्या मृतदेहाचे रस्त्यावरच मिळेल त्या जागेवर दाह संस्कार उरकत आहेत. ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही ज्यांची आर्थिक ऐपत नाही अशांच्या जीवाभावाच्या मृतदेहांना मेलेल्या कुत्र्याला पाय धरुन जसं खड्ड्यात भिरकवतात तसं अक्षरशः भिरकावले जात आहे. काळाच्या मिठीत असे गडप होणा-यांनी आपल्या हयातीत आपले एक एक बहुमोल मत देऊन रस्त्यावर, पत्र्याच्या खोलीत राहणा-या अनेकांना महालात राहण्यायोग्य बनविले होते. त्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका,महानगरपालिका,विधानसभा आणि लोकसभेत पाठवून त्यांना त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढी मालमत्ता,सुबत्ता कमावण्यासाठी मदत केली होती.परंतु आज त्यांच्या पदरात काय ? खड्डा ! तो ही असा खड्डा जो जवळच्या लोकांनी आपल्या हाताने बुजवण्याची सोय नाही. जेसीबी लावून ते खड्डे बुजवले जात असल्याचे पाहून “कुत्ते की मौत” कशाला म्हणतात याची प्रचिती येते.*
*त्यातच कॊरॊना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले लाॅकडाउन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि एवढा सगळा हाहाकार माजलेला असताना  लॊकप्रतिनीधींचे हॊत असलेले दुर्लक्ष याविषयी जनतेत कमालीची चीड निर्माण होत आहे.*
 *अगदी ग्रामपंचायतच्या निवडणूकीपासून नगरसेवक, आमदार खासदारकीच्या निवडणुकीत हजारो लिटर इंधन जाळून दिवस रात्र मतदार संघात भोंगे लावून मतांची भीक मागत, नव्हे, मतदारांच्या स्वास्थ्य्याकडे लक्ष न देता मतदारांची झोप उडवत, प्रदुषण नियंत्रणाचे सर्व नियम आणि सीमा ओलांडून हुंदडत राहणारे लोकप्रतिनिधी कोरोना विषाणुच्या रौद्ररूप रणधुमाळीत  कुठे भूमीगत झाले आहेत कुणास ठाऊक ? नाही तरी,तसे ते मतदान झाले की पाच वर्षासाठी भूमीगत होतातच. जनतेलाही ते आता चांगलेच अंगवळणी पडलं आहे.परंतु आजची परिस्थिती केवळ तोंडाला रूमाल अथवा मुखपट्टी बांधून फिरण्याएवढी त्यांना सोपी का वाटावी हेच कळत नाही. ‘कोरोना विषाणूंमुळे विनाशकारी परिस्थितीला घाबरून भारताच्या मानाने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक पटीने प्रगत असणारी राष्ट्रे अवसान गळून बसली होती. परंतु स्वत:बरोबर इतरांनाही वाचविण्याचे त्यांनी शर्तीचे अहोरात्र प्रयत्न सुरू ठेवल्याने तिथला प्रकोप आटोक्यात आला आहे. भारतात मात्र असे प्रयत्न कुठेही दिसत नाहीत. कोण जाणे इथले पुढारी कुठल्या बिळात लपून बसले आहेत ?  एकाही लोकप्रतिनिधीला आता कोरोना बद्दल जनजागृती करण्याचे,कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रयत्न करायचे गांभीर्य वाटत नाही ही इथली वस्तुस्थिती आहे*
       *शहरी लोकांपर्यंत समाज माध्यमांद्वारे खबरदारीच्या सूचना आणि काही प्रमाणात मदतीची केंद्र तरी माहीत होत आहेत.परंतु ग्रामीण भागातील लोकांचे काय ? त्यांच्याकडे कुणी पहायचं ?*
*आज गेले वर्षभरापासून  लॉकडाऊन असल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही पर्यायाने दाणा आणायला घरात दाम नाही अशी दयनीय अवस्थेत असलेल्या गरिब जनतेला  हवशे-गवशे-नवशे यांनी आपल्या सुपीक डोक्यातून लशी, इंजेक्शन आणि प्राणवायुबद्दल सोडलेल्या अफवांच्या पुड्यांद्वारे त्यांच्या मनात बसलेली भीती घालवून खरी-खुरी माहिती आणि उपाय सांगून त्यांना जागृत करणे गरजेचे आहे..*
*पत्र्याच्या खोलीतून पार बंगल्यात आणि महामंडळाच्या गाडीतून थेट स्कॉर्पियो, फॉरच्यूनर मधे बूड टेकविण्यासाठी योगदान दिलेल्या आपल्या मायबाप मतदाराला आणि त्याच्या परिवाराला अशा जीवघेण्या प्रसंगापासून वाचविण्यासाठी किमान नाका तोंडाला बांधण्यासाठी मास्क द्यावे, हॅन्डवाॅश द्यावे,लॉकडाऊन असल्यामुळे किमान कुटु़ंबाला पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करावे असे या लोकप्रतिनिधींना का वाटू नये..?*
*अनेक नगरसेवक,आमदार, खासदार,माजी,आजी मंत्री, साखर कारखानदार या सर्वांनी आपापले एक साम्राज्यच उभे केले आहे. त्या सर्वांनी आपण प्रत्येक जण समाजाचे काहीं देणे लागतो या भावनेतून आपापल्या मतदार संघात व कारखाना साईटवर किमान 100 बेडचे कोवीड सेंटर तयार करायला काय अडचण आहे?. कारण जनता आज बेड आणि अपुरे ऑक्सिजन अभावी तडफडून मरत आहे…*
*आता हीच वेळ न दवडता शहरातील आणि ग्रामीण भागातील आजी, माजी लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात व जिल्हानिहाय सर्व कारखानदार व आमदारांनी आपा आपल्या मतदार संघातील मतदार व सभासद बांधवासाठी ‘कोविड हॉस्पिटल’ सुरु करावे. अशा कठीण परिस्थितीतील त्यांच्या या कार्याला जनता कधीही विसरणार नाही.*
*जे कुणी पुढाऱ्यांची सरबराई करत, निवडणूक आणि इतर कार्यक्रमाप्रसंगी त्यांचे पोस्टर लावून शहराचे विद्रुपीकरण करत त्यांच्या जयजयकारांनी ध्वनीप्रदूषण करण्यात धन्यता मानतात त्यांनी आपल्या नेत्यांना या कामासाठी प्रवृत्त केले पाहिजे.अशा वेळी ते ऐकत नसतील तर त्याची हुजरेगिरी कायमची सोडून दिली पाहिजे.*
    *राजकीय पुढाऱ्यांनी एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की,’करोना विषाणू’ हा काही सालाबादप्रमाणे येणारा सण नाही की उत्सव नाही. एरव्ही जयंत्या,पुण्यतिथी आणि स्वत:च्या वाढदिवसावेळी ‘आमचे आशास्थान,आमचे स्फूर्तीस्थान,आमचे प्रेरणास्थान असे फलक लावून मिरवत,वाढदिवस साजरे करीत कोट्यावधी रुपये खर्च करून आपले शक्तीप्रदर्शनाचे प्रयोग सुरूच असतात .मग अशा आणिबाणीच्या वेळी हे जनतेचे आशास्थान, स्फूर्तीस्थान जग हादरवून सोडणा-या कठीण प्रसंगी मतदार संघाचे ‘कबरस्थान’ होण्याची वाट का बघत आहेत ? कणाने का होईना मतदारांचे ऋण व्यक्त करण्याची बुद्धी यांना का सुचू नये ?*
*वेळ आणीबाणीची आहे.. लोकप्रतिनिधी मतदार संघात पाच वर्षात एखाद्या वेळी मतदारांना दृष्टीस पडतात हे आता रूढ झाले आहे. अशावेळी पूर्ण सुरक्षासहीत त्यांनी मतदार संघात फिरले पाहिजे म्हणजे एखाद्या दुर्मिळ गोष्टीचे जसे महत्व पटते तसे त्यांना पाहून लोकांना ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.*
*अजूनही वेळ गेलेली नाही. लोकप्रतिनिधींकडन निवडणुकीवेळी जसे बाहेर गावी असणा-या मतदारांना खास गाड्या करून मतदानासाठी मनधरणी करून  आणण्यात येते. हॉटेल, दारूची, जेवणाची व्यवस्था करून त्यांची सरबराई करण्यात येते*
*अगदी तशीच नव्हे,तर निदान अशा कठीण परिस्थितीत त्यांची विचारपूस तरी करायला हवी.तपासणी अहवाल पॉझीटीव आलेल्या , विलगीकरणात असलेल्या कालावधी आणि नंतर त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची, जेवणाची सोय केली पाहिजे.वेळ वाईट आहे. कोरोना आज ना उद्या नष्ट होईल पण पुढा-यानो तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायला आणि खो-याने पैसे ओढायला याच लोकांची मदत घ्यावी लागणार आहे आणि कठीण परिस्थितीत केलेली मदत एखाद्या वेळी कुणी विसरू शकेल परंतु अशावेळी झालेला धॊका, अपमान आणि बेईमानी डोक्यात बसलेली असते हे सदैव ध्यानी असावे*.
*सर्व लोकप्रतिनिधींनी एवढं करावेच.जनतेची सेवा करण्याची ही नामी संधी मिळाली आहे*
*ग्रामीण भागातील जनतेला विशेष सावध करून त्यांना जपलं पाहिजे..*
*कारण शेतक-याला साथ देणारे ग्रामस्थच असतात. आणि शेतकरी तर जगलाच पाहिजे…वेळीच सावध,सजग आणि सूज्ञ होणे गरजेचे आहे.कारण या ‘करोना विषाणू’ने अखिल मानव जातीच्या अस्तित्वालाच आव्हान दिलेले आहे…*
*तेव्हा घरातच रहा ! सुरक्षित रहा !! तरिही सजग रहा !!!
*विठ्ठलराव वठारे*
*उपाध्यक्ष पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र.*
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *