Breaking News

हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?.

Advertisements
हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?.
भारतातील सर्व मान्यताप्राप्त देवाची मंदिर बंद आहेत. कोरोना मुळे आज फक्त दवाखाने म्हणजे विज्ञानाचे दरवाजे खुले आहेत.मोठ्या संख्येने माणस मृत्यू मुखी पडत असतांना त्यांचे अंतिम संस्कार करतांना कोणी नातलग जवळ नसतात तसेच हजारो वर्षा पासून अंतिम संस्कार करतांना ब्राम्हणाच्या सांगण्यावरून होणारा कर्मकांड विधी २०२० /२०२१ मघ्ये होतांना दिसत नाही.त्यामुळे मृत्यू नंतर होणारी माणसांची आणि कुटुंबाची शांती शांतच दिसत आहे.कोणत्याही माणसांचा कर्मकांड विधी झाला नाही म्हणून कोणत्याही आत्म्याने कुटुंबाला कोणताही त्रास देण्याची गेल्या दोन वर्षात एकही घटना घडली नाही.त्यामुळे संकटात असतांना करावा लागणारा कर्मकांड विधी खर्च दक्षिणा पूर्णपणे वाचला आहे.त्यामुळे बहुसंख्य हिंदू कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या नुकसान झाले नाही.पण भटा,ब्राम्हणाचे मोठे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत आहे.त्यामुळेच देवावर आणि देवाच्या मंदिरावर  नियंत्रण असणारा समाज आज संपूर्णपणे गोंदळलेला आहे. त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.त्यामुळे ते कोणतेही कृत करण्यास मागे पुढे पाहणार नाही. वृत्तवाहिन्या,प्रचारप्रसार माध्यमाद्वारे जनतेला सत्य माहिती देण्या ऐवजी असत्य माहिती देऊन कायदा सुव्यवस्था बिगडविण्याचे काम करीत आहेत. त्याचे एक नव्हे शेकडो उदाहरण आज समोर येत आहेत.बांद्रा रेल्वे स्टेशनबाहेर जमवला गेलेला जमाव हा सुनियोजित कट असल्याचीच शक्यता अधिक वाटतेय. बांद्रा रेल्वे स्टेशन हे काही युपी-बिहार किंवा उत्तर भारतासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुटण्याचे रेल्वे स्थानक नव्हते. जर स्वयंस्फुर्तीने जमाव जमलाच असता तर सीएसटी, दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनल्सला जमायला हवा होता. परंतु, तो बांद्रा रेल्वे स्टेशनवर जमवला गेला. आणि बारकाईने गर्दीचे फोटो पाहिले असता गांवी जाणाऱ्या लोकांकडे सामानाच्या पिशव्या कोणाकडेच दिसल्या नाही.याचे उत्तर शोधायला हवे. हा जमाव जमवण्यामागे अद्रृश्य हात कुणाचे आहेत याचे उत्तर आज पर्यंत मिळाले नाही. एकिकडे महाराष्ट्र राज्य सरकार कोरोना प्रतिबंधाच्या बाबतीत उत्तम काम करत असताना व त्यासंबंधीची वाहवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समस्त महाराष्ट्रप्रेमी जनतेकडून मिळत असताना, या सगळ्या प्रयत्नांना डाग लागेल असा हेतू बाळगून जनतेमधे अफवा पसरवणारे झारीतले शुक्राचार्य पेशव्याचे वारसदार लपून राहिले नाहीत.क्षणिक राजकिय फायद्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणार्‍यां विरोधी पक्ष नेत्याचे सरकार व पोलीस दडपणाखाली काहीच करतांना दिसत नाही. आता यांना क्षमा नकोच !!. हे उघड आर एस एस प्रणित संस्था संघटनाचे काम आहे.या बाबत फडणवीस बेंबीच्या देठापासून बोंबलत आहे.तिकडे शेलारमामा,दरेकर कर्तव्य भावनेने बांद्रा रेल्वे स्टेशनवर आणि रात्री बारा नंतर पोलीसा स्टेशन मध्ये हजर असतात.हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात आल्यामुळे ह्या लक्षवेधी घटना घडविल्या जात आहेत.
कोरोनामुळे हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात आली.कोरोनाचे संकट देशावर दोन तीन वर्ष राहिल्यास तीन टक्के समाजाची रोजगार हमी आणि समाजात असलेली अदृश्य देवाची भिती मानवाच्या मनातून निघून जाईल. यांच्या विरोधात महात्मा ज्योतीराव फुले.पेरियार रामास्वामी नायकर यांनी अतिशय स्पष्ट शब्दात एकवेळा नाही तर हजारो वेळा प्रश्न उपस्थित केले होते.निसर्गाच्या नियमावर स्वतच्या मंत्राचे नियंत्रण आहे हे दाखवणारे आज निसर्गाच्या छोट्याश्या विषाणू समोर स्पेशल नापास झाले आहेत.त्यापासुन स्वताला हिंदू समजणारा सहा हजार सहाशे जातीत विभागलेला समाज कोणताही बोध घेण्यास तयार नाही. त्यामुळेच आज  प्रत्येक माणसा समोर एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहिला पाहिजे कि प्रत्येक गांवात मंदिर,मस्जिद,चर्च,आणि गुरुद्वारा म्हणजेच प्रत्येक धर्माची मंदिरे आहेत. पण एक हि सार्वजनिक दवाखाना का नाही?. त्यांची माणसाला किती गरज आहे. हे कोरोना महासंकटाने सर्वच देशाला दाखवून दिले. दोन तीन हजार लोकसंख्या असलेल्या पांच सहा गाव मिळून एक तरी सार्वजनिक दवाखाण्याची अतिशय आवश्यकता असतांना मंदिरे आहेत पण दवाखाना उभेच राहू दिल्या गेले नाहीत. किती मोठे षड्यंत्र आहे हे आता तरी “गर्वसे कहो हम हिंदू है.” म्हणणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. मंदिराच्या उभारणी साठी सर्व गांवातील लोकांना एकत्र आणणारा भट,ब्राम्हण पुजारी सर्व संकटांना तोंड देण्यासाठी देवाचे मंदिर किती आवश्यक आहे हे पटुन सांगू शकतो.आणि स्वताच्या तीन टक्के समाजाची कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या रोजगार हमी योजना यशस्वी पणे राबवितो. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्याची परिस्थिती हि दयनीय असते.कोरोना सारखे महासंकट  तालुक्यावर आले तर सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती हि उपाय योजना नाही.निसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीत विज्ञानवादी यंत्रणा कामा येऊ शकते,अज्ञानवादी, अंधश्रद्धावादी अतिभव्य मंदिर,मस्जिद चर्च कोणत्याही धर्माची प्रार्थनास्थळ तुमचे रक्षण करू शकत नाही.हे आज सिद्ध होत आहे.त्यामुळे सद्विवेक बुद्धी वापरून जागे व्हा.भविष्यात आरोग्यासाठी सर्व आधुनिक सोयी सुविधाने सज्ज हॉस्पिटलची किती गरज आहे हे लक्षात घ्यावे. 
म्हणूनच तीन टक्के संख्या असलेला समाज देशातील असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना रस्त्यावर उतरवण्यासाठी वेगवेगळ्या कुलापती काढत आहेत.मी कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत,लिहत नाही,तर निसर्गाच्या नियमांचे समर्थन करून विज्ञानाच्या कक्षा कशा प्रकारे वाढविण्यासाठी माणसांनी प्रयत्न केला पाहिजे हेच सांगण्याचा खोटाटोप करीत आहे.
सर्व धर्माच्या लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की कोणत्याही माणसांचा शारीरिक अपघात झाला,तर त्याला दवाखान्यात नेणे आवश्यक असते, तेव्हा त्याला मंदिर,मस्जिद,चर्च मध्ये नेल्या जात नाही. पण आपल्या मेंदूवर लहानपणापासून कोरून ठेवले असते की आपला रक्षण करणारा देव,अल्ला,गॉड आहे आणि तो मंदिरात, मस्जिद, चर्च मध्ये चोवीस तास,साती दिवस हजर असतो.पण तो भट,ब्राम्हण,पुजारी,मौलवी,काझी,पाद्री,फादर यांच्या सांगण्या वरूनच मदत करण्यासाठी येतो.अन्यता नाही.यासाठी त्यांना मुक्तहस्ताने दान दिले पाहिजे. दक्षिणा दानधर्म केला पाहिजे. आणि या दानधर्मा वर दक्षिणेवर तुमचा,सरकारचा अधिकारी नसतो, भट,ब्राम्हण,पुजारी,मौलवी,काझी,पाद्री,फादर यांचा जन्मसिद्ध अधिकार असतो. २३ मार्च २०२० पासुन देशातील सर्व मंदिरात, मस्जिद,चर्च चोवीस तास,साती दिवस भक्तांच्या रक्षणासाठी हजर असलेले प्रार्थनास्थळ बंद आहेत. त्यामुळेच भट,ब्राम्हण,पुजारी,मौलवी,काझी,पाद्री,फादर यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे.
वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे तीन टक्के समाजाचे लोक पोथी,पुराण,वेद,मनुस्मृती अशा धर्म ग्रंथाचा हवाला देतात. पण ही लिहली कोणी त्यांच्या पूर्वजांनी नां?. त्याचं रितीरिवाज,परंपरा कायम ठेवून बहुसंख्य बहुजन समाजाचे धर्माच्या देवाच्या नांवा वर आर्थिक शोषण हजारो वर्षांपासून सुरू आहे. कोरोनाच्या महासंकटाने सर्वांचेच गोरख धंदे, बहुजन बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे आर्थिक शोषण करणारे हड्डे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळेच हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे
१८९७ च्या प्लेगच्या साथी पासुन मार्च २०२० च्या कोरोना महामारी पर्यंत कोणत्याही धर्माच्या देवांनी मंदिर,मस्जिद,चर्च,गुरुद्वारा यांनी माणसांचा बचाव करण्यासाठी काही केले नाही. भट,ब्राम्हण, पुजारी, मौलवी, काझी,पाद्री, फादर यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली तेव्हा सर्वच सांगतात जमाना बदलला लोक सुशिक्षित झाल्यामुळे घोर पाप होत आहेत,कलीयुग आला. देशात जगात लोकांना कायम मूर्ख बनविता येत नाही. परंतु धर्म अशी अदृश्य वस्तू आणि क्षेत्र आहे.की लोकांना पिढ्यानपिढ्या मूर्ख बनविण्यात येते.पण कोरोना महासंकटाने  भट,ब्राम्हण,पुजारी,मौलवी,काझी,पाद्री,फादर यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे.
हजारो वर्षांपासून धर्माच्या देवाच्या मंदिरावर वर्चस्व असणाऱ्यांची तरुण पिढी सुशिक्षित झाली आणि त्यांनी चॅनल,प्रिंट मीडियावर वर कब्जा मिळविला.चॅनल मीडिया, प्रिंट मीडिया चा मालक बनिया असेल पण संपादक,मुख्य कार्यकारी संपादक ब्राम्हणच असेल सर्वांनाच मी नालायक म्हणणार नाही काही अपवाद आहेत त्यांची जाहीर माफी मागतो, पण निसर्गाचा नियम आहे गव्हा बरोबर खडे ही दळल्या जातात, त्याचं बरोबर काही लोक योग्य वेळी जातीसाठी माती खातात, एक मासुम गोरा गोमटा चेहरा असलेला मक्कार खोटा पत्रकार कोणत्याही आतंकवादी पेक्षा शंभर पटीने खतरनाक असतो.एक आतंकवादी एकाद्या ठिकाणी हल्ला करून पन्नास शंभर लोकांचा बळी घेऊ शकतो.पण एक मक्कार खोटा पत्रकार एकच वेळी देशातील लाखो लोकांच्या मध्ये दंगल घडवून देशाची कायदा सुव्यवस्था बिगडवून ठेऊ शकतो.दोन समाजात तेढ निर्माण करू शकतो, राजकीय समीकरण मोडून काढू शकतो.म्हणून सर्व सुजाण नागरिकांनी सावध असणे आवश्यक आहे. जमाव बंदी असतांना अचानक गोळा झालेली गर्दी पाहून वेळीच पोलिस दक्षता घेतात म्हणून मोठा अनार्थ टाळला जातो.
कोरोना महासंकटाने भट,ब्राम्हण,पुजारी,मौलवी,काझी,पाद्री,फादर यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे.त्यामुळे त्यांच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक नेतृत्व करणारा समाज बहुसंख्य समजत असंतोष निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करणार आहेत.त्या पासून बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजाने सावध राहावे.आणि कोरोना मुक्तच नव्हे तर कर्मकांड विधी भय मुक्त व्हावे. त्यासाठी हॉस्पिटलची गरज आहे.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप, मुंबई,
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना, संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मुंबईत दरड कोसळली, 165 कुटुंबांना धोका

मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या …

आंबेडकरी विचार मोर्चा प्रणित आंबेडकरी महिला मोर्चाच्या नवनियुक्त अध्यक्षांच्या सत्कार

मुंबई : आंबेडकरी, फुले,शाहू,संत रविदास यांच्या विचारांचा चळवळीला पुढे नेण्यासाठी महिलांच्या मोठया प्रमाणात योगदान आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *