Breaking News

पोस्ट कोव्हीड ओपीडीमध्ये म्युकरमायकोसिस, शुगर तपासणी सुरु करा ,आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचना :

Advertisements

आरोग्य विभागाची आढावा बैठक
चंद्रपूर, ता. २५ : कोरोना सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावा, यासाठी पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरु करून  म्युकरमायकोसिस व शुगर तपासणी करण्याच्या सूचना मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या.
म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर हद्दीत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. जनबंधू, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ. जयश्री वाडे, डॉ. गाडगे, डॉ. लाहेरी, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा आदी उपस्थित होते.
आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर “म्युकरमायकोसिस” हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्या पर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपाच्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जनजागृती, आशा वर्करमार्फत रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या.
यावेळी मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी सांगितले की, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह असलेल्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कोरोनातून बरे झालेल्या अशा रुग्णांना आरोग्य विभागाद्वारे फोनद्वारे माहिती घेण्यात येत आहे. शुगर नियंत्रणात ठेवण्याकरिता डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या सर्व्हेच्या माध्यमातून मधुमेह असलेल्या रुग्णांची यादी उपलब्ध आहे. एक एप्रिलपासून जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, अशांची रक्ताची तपासणी आरोग्य चमूच्या माध्यमातून घरोघरी जाऊन करण्यात येईल. नागरी आरोग्य केंद्रात कान, नाक, घसा व मुख शल्य चिकित्सकांच्या मार्फतीने म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे लक्षणे आहेत का, हे देखील तपासण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी सांगितले. याशिवाय कोरोना चाचणी केंद्र आणि लसीकरण केंद्राचा आढावा घेण्यात आला.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *