Breaking News

दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात – वेळेत होणार अकरावीचे प्रवेश

दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात
  – वेळेत होणार अकरावीचे प्रवेश

मुंबई,
कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरी निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचे शिक्षण विभागाने ठरवले आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केल्याची माहिती आहे. यंदा दहावीला 16 लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी दहावीची अंतिम परीक्षा परीक्षा दिली नसली तरी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दहावीचे निकालपत्र द्यायचे आहे. नववी आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाणार असून, त्या आधारे दहावीचा निकाल तयार केला जाणार आहे.

नववीतील गुणांचे 50 टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे 50 टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल तयार केला जाणार आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला 30 गुण देण्यात येणार आहेत. तसेच गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे 20 गुण दिले जाणार आहेत. अशा पद्धतीने दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे. दहावीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढे अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना आपण यापेक्षा चांगले गुण मिळवून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतो, असे वाटत असेल त्यांच्यासाठी सीईटीचा पर्याय शिक्षण विभागाने ठेवला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्यात येणार आहे. मात्र ही सीईटी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे.

About Vishwbharat

Check Also

विज्ञान प्रदर्शनी मे छिन्दवाड़ा को प्रदेश में प्रथम स्थान प्राप्त

विज्ञान प्रदर्शनी मे छिन्दवाड़ा को प्रदेश में प्रथम स्थान प्राप्त टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *