Breaking News

वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन प्रियसीवर बलात्कार

Advertisements
बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल
बल्लारपूर :- प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर मध्ये घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त  आरोपी प्रियकराचे नाव सन्मुखसिंग बुंदेल आहे.तो बल्लारपूर या ठिकाणचा रहिवाशी आहे. त्याची प्रेयसीदेखील याच शहरात राहते. आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचे गिफ्ट देतो असे सांगत कारवा जंगलात नेले. या ठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. यानंतर त्या प्रियकराने फेसबुकवर बनावट खाते काढून बलात्काराचे सर्व व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले.
आरोपी प्रियकराने सोशल मीडियावर केलेल्या या संतापजनक प्रकरानंतर पीडित मुलीने पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रियकर हा पीडितेला जातीवाचक शब्दात बोलायचा. आरोपीच्या या लज्जास्पद वागणुकीमुळे पीडितेनं आरोपीला लग्नास नकार दिला होता. प्रेयसीने लग्नाला दिलेल्या नकार पचवता न आल्याने आरोपीने, ऐन वाढदिवसी गिफ्ट देण्याचा बहाणा करत जंगलात नेऊन तिच्यावर करत याचा बदला घेतला. हि घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपी प्रियकर सन्मुखसिंग बुंदेलला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

गाणं गात असताना प्रसिद्ध गायिकेवर गोळीबार…नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. निशा लाइव्ह इव्हेंटचे सादरीकरण करीत …

लाखों की सागौन लकड़ी के साथ पांच लकडी तस्कर और 3 वाहन गिरफ्तार

विलासपुर। छत्तीसगढ़ के गौरेला-पेंड्रा-मरवाही (GPM) जिले में वन विभाग की टीम ने तीन अलग-अलग कार्रवाई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *