Breaking News

अबब…!नवीन टाकी बदबद लागली गळायला.

Advertisements
अबब…!नवीन टाकी बदबद लागली गळायला.
(टाकीचे बांधकाम निकृष्ठ,नगरसेवकांच्या आरोपांना यामुळे दुजोरा,वरिष्ठांच्या भुमिकेकडे लक्ष.)
कोरपना (ता.प्र.)
         चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर गडचांदूर नगरपरिषदच्या सहाय्य निधीतून शहरातील मध्यभागी असलेल्या पाणीच्या नवीन टाकीचे बांधकाम संपल्यातच जमा आहे.टेस्टिंगसाठी सदर टाकीत पाणी भरण्यात आले.मात्र सदर टाकीच्या रिंगातून व मुख्य स्लॅब मधून बदबद पाणी गळायला लागले.आता यावरून कामाचा दर्जा कसा असेल याची कल्पनाच न केलेली बरी.सदर टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार चार दिवसापुर्वीच येथील विरोधी नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी,नगरविकास मंत्री, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विभाग चंद्रपूर याच्यकडे केली होती हे मात्र विशेष.
     सदर कामाची कार्यान्वय यंत्रणा ही महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाला देणे गरजेचे होते. मात्र या कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने सदरचे काम न.प.कडेच ठेवले.पिदूरकर हा मेकॅनिकल इंजिनीअर असल्याने त्याला सिव्हिल कामांचा कुठलाही अनुभव नाही.निव्वळ कामात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने याच्याकडे टाकीचे काम सोपवण्यात आले. तसेच याला सिव्हिल कामाची एमबी बनविण्याचे अधिकार नसतांनाही त्याने स्वतः वाढीव एमबी बनविली व त्यानुसारच संबंधित ठेकेदाराला आरए बिलही दिले आणि शेवटचे बिल देण्याच्या बेतात आहे.असे आरोप करण्यात आले असून यासर्व आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी या दोन्ही नगरसेवकांनी केली होती.हे दृश्य पाहून आता यांच्या आरोपांना एक अर्थी दुजोराज मिळाला आहे.आता लाखोंच्या खर्चाने बनविण्यात आलेली सदर नवीन पाण्याची टाकी जर आता पासूनच गळत असेल तर भविष्यात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.हे दृश्य पाहून जनतेचा पैसा पाण्यातच गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.असे मत व्यक्त होत आहे.आता याविषयी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
       ————//———–
“बिल काढण्याच्या घाईने नविन पाण्याच्या टाकीची नगरपरिषद गडचांदूरकडून आज टेस्टिंग करण्यात आली.तेव्हा सदर टाकी ठिकठिकाणी लिकेज निघाली,लगेच टाकीतील पाणी खाली करण्यात आले.सदर टाकीचे काम दर्जेदार व्हावे म्हणुन कर्तव्यदक्ष अधिकारी तथा पदाधिकारी यांनी सदरचे काम सिव्हिल इंजिनिअरकडे न देता नामवंत,चतूर,कर्तबगार इंजिनीअर स्वप्निल पिदूरकर यांच्याकडे काम सोपविले होते.तरीपण टाकीचे काम निष्कृष्ठ झाले.जरी टाकीचे काम निष्कृष्ठ झाले असले तरी चालेल परंतू अधिकाऱ्यांचा हेतू मात्र साध्य झाला.आता इतर काम सुध्दा हा नामवंत इंजिनिअर दर्जेदार करतील की,निष्कृष्ठ करून आपला हेतू साध्य करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.” अशाप्रकारे नगरसेवक अरविंद डोहे यांनी “दै.चंद्रधून” ला प्रतिक्रिया दिली.सदर विषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी संबंधित ठेकेदार व इंजिनीअर यांना संपर्क केला असता नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा संपर्क झालेला नाही.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *