Breaking News

राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह

Advertisements

राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह
राजुरा-
मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येणार्‍या राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 172 मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचे मृतदेह आढळून येत असल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

Advertisements

नर वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असून, त्याचे सर्व अवयव कायम असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश गलगट यांनी दिली. या वाघाचा 4 ते 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज गलगट यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती कळताच उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहाय्यक वनसंरक्षक प्रितम कुमार कोडापे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

Advertisements

मागील काही दिवसांपूर्वी या क्षेत्रात अस्वल मृतावस्थेत आढळून आली होती. सुमठाणा मार्गावर चितळाचा मृत्यू झाला. त्यामुळे वन्य जीवाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करणार्‍या वनकर्मचार्‍यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नेफडो संस्थेचे बादल बेले यांनी केली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *