Breaking News

केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी   – डॉ. अशोक जिवतोडे

Advertisements

केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी  – डॉ. अशोक जिवतोडे
चंद्रपूर,
केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी मंगळवारी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, डॉ. अविनाश वारजुरकर, जयंता जोगी, प्रेमलाल पारधी, कुणाल चहारे, मनोज गौरकार, देवराव दिवसे, अनिल दागमवार, राजू हिवंज, दिलीप पायपरे, सुनील कोहपरे आदींची उपस्थिती होती.

Advertisements

यावेळी डॉ. अशोक जिवतोडे व महासचिव सचिन राजुरकर यांच्या हस्ते आ. नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. इतर मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याबाबत पटोले यांना निवेदन देण्यात आले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *