Breaking News

65 अधिकाऱ्यांचा रेल्वेत विनातिकीट प्रवास : ‘वंदे भारत’मध्ये बिलासपूर ते नागपूर दरम्यानची कारवाई

बिलासपूर ते नागपूरदरम्यान डिसेंबरमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु झाली. या एक्सप्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत रेल्वेचेच ६५ अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. काही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते.

झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात हे अधिकारी काम करतात त्या विभागांना पत्र पाठवून चौकशी व कारवाई करण्यास सांगितले आहे. असे सर्व अधिकारी वरिष्ठ प्रशासकीय ग्रेडच्या खालच्या रँकचे आहेत. बिलासपूर ते नागपूर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.

येथे थांबते ही एक्सप्रेस

ही रेल्वे बिलासपूर ते नागपूर हे अंतर साडेपाच तासांत पार करते. बिलासपूरनंतर रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया येथे थांबते.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

नागपुर कें कस्तूरचंद पार्क के गुंबदों पर चढी भीड़ : शिकायत नहीं

नागपुर कें कस्तूरचंद पार्क के गुंबदों पर चढी भीड़ : शिकायत नहीं   टेकचंद्र शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *