महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अजित पवार सकाळी पुण्यात होते. अजित पवार यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा आहेत. मुंबईच्या शासकीय निवास्थानी अजित पवार असल्याची माहिती आहे. मात्र, अजूनतरी कोणताही दुजोरा मिळालेला नाही.आता पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार अवतरले आहेत.
मागच्या वर्षी जून महिन्याच्या २१ तारखेला एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कसं कोसळलं? शिंदे फडणवीस सरकार कसं स्थापन झालं? हे महाराष्ट्राने पाहिलं आहेच. अशात आता अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार का? आणि तो काय असणार याची चर्चा राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे.