Breaking News

हत्तीरोग निर्मूलन : सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला 1 जुलैपासून प्रारंभ

Advertisements

हत्तीरोग निर्मूलन : सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार

Advertisements

मोहिमेला 1 जुलैपासून प्रारंभ

Advertisements

चंद्रपूर दि. 22 जून : हत्तीरोग निर्मूलनाकरीता सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता 1 जुलै 2021 पासून जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात सुरुवात होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक पार पडली. सदर बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 हत्तीरोग निर्मुलनासंदर्भात राबविण्यात आलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात रूग्ण संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.  सदर मोहिमेत आरोग्य विभागातील सर्व अधिकारी  व कर्मचारी,  नागरिकांना औषध खाण्यास प्रवृत्त करणार आहेत. हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता यावर्षी देखील हत्तीरोग विरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके, अतिगंभीर रूग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालणे तसेच जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

तांत्रिक और जादुई पौधा है अपामार्ग-लटजिरा-चिरचिटा

तांत्रिक और जादुई पौधा है अपामार्ग-लटजिरा-चिरचिटा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान …

खाण्यात भेसळ झाल्यास थेट तुकाराम मुंढेकडे करा तक्रार!

भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा आरोग्यास अपायकारक रसायनांचा वापर केल्यावरून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *