Breaking News

शाळेत नापास, पण आता IAS, IPS अधिकारी, वाचा यशोगाथा

विश्व भारत ऑनलाईन :

देशातील सर्वात ‘टफ’ परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) असते. विद्यार्थी दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस, आयपीएस होतात. पण, आयपीएस,आयएएस अधिकारी होणे वाटते तितके सोपी नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस,आयपीएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी उत्तीर्ण झालेत.

रुक्मणी रियार

आयएएस रुक्मणी रियार राजस्थानमध्ये जिल्हाधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबमधील चंदीगडची आहे. रिपोर्ट्सनुसार, त्या सहावीच्या वर्गात नापास झाली होत्या. पण असं असतानाही यूपीएससी परीक्षेत एआयआर 2 मिळवून इतके मोठे स्थान मिळवले आहे. रुक्मणी रियार यांचे वडील देखील आयएएस अधिकारी आहेत.

मनोज शर्मा

महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज शर्मा हे 12वी मध्ये नापास झाले होते. इयत्ता 12वीत अनुत्तीर्ण होण्याव्यतिरिक्त, एव्हरेज विद्यार्थी होते आणि खूप कमी गुणांसह पास व्हायचे. त्यांची यशोगाथा वाचून सर्वांना खरोखरच प्रेरणा मिळते.

अंजू शर्मा

आयएएस अंजू शर्माने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती दहावीच्या प्री बोर्ड परीक्षेत नापास झाली होती. इतकंच नाही तर 12वीला पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. मात्र, नंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आयएएस अंजू शर्माने या घटनेतून शिकत कठोर परिश्रम केले आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात त्याच्या आईने त्याला साथ दिली.

About विश्व भारत

Check Also

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन 

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची मुंबईवारी

अर्थ राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी गडचिरोलीत औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *