विश्व भारत ऑनलाईन :
दिवाळीपूर्वी पोलीस, महसूल विभागात बदल्या होण्याची शक्यता होती. मात्र, भारतीय प्रशासकीय आणि भारतीय पोलीस अर्थात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
तर, आता दिवाळी आटोपत आली असल्याने राज्यात पुन्हा प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत. त्यात महसूल विभागातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दीडशे हुन अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात.अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अनेक अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
खरंच बदल्या होणार की हुलकावणी मिळणार, असाही प्रश्न आहे. मंत्र्याच्या काही मर्जीतील अधिकाऱ्यांच्याच बदल्या होतील, अशीही चर्चा आहे. काही अधिकारी वर्ग यंदा बदली करू नये, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी शक्यता वर्तवीत आहेत.