Breaking News

तरुणांनो, लक्ष द्याच ! तीन महिन्यांत पोलिस, तलाठी पदांची भरती

 

विश्व भारत ऑनलाईन :

राज्याच्या 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद, यात मंजूर पदांची संख्या 10,70,840 इतकी आहे. पैकी जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांची सव्वादोन लाख तर जिल्हा परिषदेच्या 65 हजार पदे रिक्त आहेत.

आता शिंदे- फडणवीस सरकारने त्यातील 75 हजार पदांच्या भरतीची तयारी सुरू केली आहे. पहिल्यांदा पोलिस व तलाठी भरती होईल. त्याचप्रमाणे आरोग्य, जलसंपदा, कृषीसह जिल्हा परिषदांमधील पदांची भरती नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत घेण्याचे नियोजन आहे.

सरकारच्या सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविणे कठीण झाले आहे. तरीपण, मागील साडेसहा वर्षांत पदभरती झाली नाही. कोरोना संकटामुळे वित्त विभागाने भरतीवर निर्बंध घातले होते. पण, आता वित्त विभागाचे निर्बंध उठविण्यात आले आहेत. स्वतःच्याच पक्षप्रमुखाविरुद्ध बंडखोरी करून भाजप सोबत सरकार स्थापन केल्यानंतर आपली प्रतिमा मलीन होणार नाही याची पुरेपूर खबरदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. लोकहिताचे निर्णय घेताना त्यांनी शेतकरी, तरुण आणि हातावर पोट असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर 75 हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर डिसेंबरपर्यंत तलाठी भरती होणार आहे.

मंजूर पदे आणि कंसात अंदाजित रिक्त पदे
गृह विभाग :
2,92,820 (50,851)सार्वजनिक आरोग्य : 62,358 (26,712)जलसंपदा : 45,217 (23,489)महसूल व वन विभाग : 69,584 (13,557)उच्च व तंत्र विभाग : 12,407 (4,395)वैद्यकीयशिक्षण,औषधीद्रव्ये:36,956 (13,423)आदिवासी विकास विभाग : 21,154 (6,813)शालेय शिक्षण व क्रिडा : 7,050 (3,948)सार्वजनिक बांधकाम : 21,649 (9,751)सहकार पणन : 8,867 (3,433)सामाजिक न्याय : 6,573 (3,421)उद्योग, ऊर्जा व कामगार : 8,197 (3,786)वैद्यकीय शिक्षण : 36,956 (14,423)वित्त विभाग : 18,191 (6,219)शालेय शिक्षण : 7,050 (4,388)अन्न व नागरी पुरवठा : 8308 (3,449)महिला व बालविकास : 3,936 (1,851)विधि व न्याय विभाग : 2,938 (1,401)पर्यटन व सांस्कृतिक : 735 (397)सामान्य प्रशासन : 8795 (2,427)

About विश्व भारत

Check Also

अब सोलर पॉवर से जगमगाएंगे छात्रावास और आश्रम शालाए

अब सोलर पॉवर से जगमगाएंगे छात्रावास और आश्रम शालाएं टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

कांग्रेस ने डीजीपी रश्मि शुक्ला को हटाने के लिए आयोग को भेजा खत

कांग्रेस ने डीजीपी रश्मि शुक्ला को हटाने के लिए आयोग को भेजा खत   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *