विश्व भारत ऑनलाईन :
व्हिडीओ बघा👇👇👇
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. काही वाद ते स्वतः ओढवून घेतात. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान असून, शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी मत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. त्यात आता अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असे म्हटले.त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. त्यांच्या वक्तव्यानंतर तिथे असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचं पाहून सत्तार काहीसे गोंधळले. त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद करण्यास सांगितला. मात्र, सत्तार यांचा “दारू पिता का?” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तर, या व्हिडीओवरून काहींनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.तर, काँग्रेसने सत्तार यांच्यावर टीका केली आहे.