Breaking News

तहसीलमध्ये अडकले महिला, वृद्धांचे अनुदान

Advertisements

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना लाभार्थींमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असे गट पाडून अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे.

Advertisements

या लाभार्थींना अनुदान सध्या उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचे अनुदान वितरीत झाले. तरी ऑक्टोबरचे अनुदान अद्याप वितरीत करण्यात आलेले नाही. ऑक्टोबर महिन्याचे अनुदान प्रोसेसमध्ये असल्याचे संजय गांधी योजना कार्यालयाने सांगितले. सहा योजनांच्या माध्यमातून एक लाख ८६ हजार ७९३ लाभार्थी अनुदानाचा लाभ घेत आहेत.

Advertisements

संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण गटाच्या लाभार्थींना एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत २६ कोटी ८४ लाख ८९ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थींना सहा कोटी २८ लाख ९९ हजार ९०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना ५७ लाख ९८ हजार ६०० रुपये वाटप करण्यात आले आहे.

अजून ऑक्टोबरचे अनुदान मिळणे बाकी आहे. अजून डिसेंबर पर्यंत पुरेल एवढे पुरेसा निधी संजय गांधी निराधार योजनेच्या सर्वसाधारण लाभार्थींकरता जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थींना १२ लाख ९९ हजार २९ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे तर अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना एक कोटी ११ लाख ७८ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्वसाधारण लाभार्थींना ५८ कोटी ६० लाख २६ हजार ९०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

IPS अफसर को कांग्रेस का साथ! दीपक बैज ने बताया संवेदनशील मुद्दा

IPS अफसर को कांग्रेस का साथ! दीपक बैज ने बताया संवेदनशील मुद्दा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

उप आयुक्त का दिव्यांग प्रमाण पत्र फर्जी : सगे भाई ने लगाया आरोप

उप आयुक्त का दिव्यांग प्रमाण पत्र फर्जी : सगे भाई ने लगाया आरोप टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *