Breaking News

आजपासून आचारसंहिता लागू : थेट सरपंच पदांसाठी 18 डिसेंबरला मतदान

Advertisements

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

Advertisements

मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या,तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.

Advertisements

20 डिसेंबरला मतमोजणी

नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

कुठल्या ग्रामपंचायतीत निवडणूक?

– अहमदनगर – 203

– अकोला – 266

– अमरावती – 257

– औरंगाबाद – 219

– बीड – 704

– भंडारा – 363

– बुलडाणा – 279

– चंद्रपूर – 59

– धुळे – 128

– गडचिरोली – 27

– गोंदिया – 348

– हिंगोली – 62

– जळगाव – 140

– जालना – 266

– कोल्हापूर – 475

– लातूर – 351

– नागपूर – 237

– नंदुरबार – 123

– उस्मानाबाद – 166

– पालघर- 63

– परभणी – 128

– पुणे – 221

– रायगड – 240

– रत्नागिरी – 222

– सांगली – 452

– सातारा – 319

– सिंधुदुर्ग – 325

– सोलापूर – 189

– ठाणे – 42

– वर्धा – 113

– वाशीम – 287

– यवतमाळ – 100

– नांदेड – 181

– नाशिक – 196

– एकूण – 7,751

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *