नागपुरात हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे. सरकार नागपुरात दाखल होताच, नक्षलवादी सक्रीय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिलाय.
सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा… सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा,असे आवाहनही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून केला आहे.
बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्युरोने आज हे प्रेस रिलीज काढलंय. तसंच तेंदूपत्तालाही जीएसटीतून सूट देण्याची मागणी नक्षल्यांनी केली आहे.
विश्वभारत News Website