चेहरा दिसेल सुंदर : एका रात्रीत मुरुमं होतील गायब…

चेहऱ्यावर मुरूमांची समस्या तरुणाईमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या पिण्याच्या बदलत्या सवयीमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने असतात. मात्र त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुमे घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

बर्फ थेरपी

चेहऱ्यावर मुरुमे आल्यास त्यावर बर्फ लावणे उत्तम. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होते. कपड्यामध्ये बर्फ घेऊन तो मुरुमांच्या जागी काही वेळ ठेवा. ही प्रक्रिया काही काळाने पुन्हा पुन्हा करा.

टूथपेस्ट

मुरुमे आल्यावर त्यावर सफेद टूथपेस्ट लावा. यामुळे मुरुमांची सूज कमी होण्यास मदत होते. मात्र हे ध्यानात ठेवा जेल टूथपेस्ट नको.

स्टीम उपचार

चेहऱ्यावर चमक हवी असल्यास स्टीम गरजेची आहे. यामुळे केवळ चेहऱ्यावर घाण दूर होत नाही तर त्वचा मुलायम होण्यास मदत होते. स्टीममुळे रोमछिद्रे खुली होतात. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते.

लसूण

लसणामध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल तसेच अंटीसेप्टिक आणि अँटऑक्सिंडंट्स सारखे गुणधर्म असल्याने मुरुमांवर लसूण गुणकारी ठरतो. यातील सल्फर त्वचेसाठी लाभदायक. लसूण सोलून मुरुमांवर ते लावा. पाच ते सात मिनिटे लसूण लावून चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही प्रक्रिया एका तासानंतर पुन्हा करा.

अंड्यातील सफेद भाग

अंड्यातील सफेद भागात प्रोटीन असते. अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तीन अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा. त्यानंतर ही पेस्ट मुरुमांवर लावा. जेव्हा पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा धुवून टाका. असे नियमितपणे चार वेळा करा. त्यानंतर उरलेली पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा.

टोमॅटो

टोमॅटो तेलकट त्वचेसाठी उपयुक्त. टोमॅटोमुळे ब्लॅकहेड्स तसेच चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यात उपयोग होतो. ताज्या टोमॅटोचा रस बनवून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर एका तासाने चेहरा धुवा.

केळाचे साल

केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे साल. मुरुमे झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. ३० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.

(टीप: 👆ही माहिती माहितीच्या आधारावर दिली आहे. विश्व भारत याची खातरजमा करत नाही)

About विश्व भारत

Check Also

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *