उद्यापासून डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल

राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.शनिवारपर्यंत वेळ देऊनही चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ‘मार्ड’ संघटना ठाम आहे. राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहेत.दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मार्डचे डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्डने राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी संप करत असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय, काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील मागण्या जोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा अधिक ताण येत आहे. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मार्डच्या संपात राज्यातील डॉक्टर सहभागी होणार असल्याने अनेक जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. निवासी डॉक्टरांच्या संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला आहे. नागपुरातील मेडिकल, मेयोसह राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डॉक्टरांच्या मागण्या

मार्डने वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था असून निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरण्याची मागणी मार्डने केली आहे. त्याशिवाय महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तत्काळ लागू करा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याची मागणी मार्डने केली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

About विश्व भारत

Check Also

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *