Breaking News

नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा कापला

Advertisements

औरंगाबादमधून एक घटना समोर आली आहे. जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जात असताना एका महाविद्यालयीन तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजाने कापल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मांज्यामुळे तरुणाचा गळा आठ इंच कापला गेला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. चैतन्य शंकर मुंढे (वय 19) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

Advertisements

घटना अशी घडली…

Advertisements

चैतन्य हा मुळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी आहे. तो औरंगाबादेत मामाकडे मुक्कामी असून, तो नीटची तयारी करत आहे. तो शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठ गेटकडे दुचाकीवरून जात होता. अचानक विद्यापीठ गेटजवळ त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला आणि यात त्याचा सात ते आठ इंच गळा कापला गेला. त्याने तात्काळ दुचाकी थांबवून पाहिले असता, पतंग उडवणारी मुलं तेथून निघून गेली.
त्‍याने त्याच्या गळ्याला हात लावून पाहिला असता, त्‍याला जखम झाल्‍याचे दिसून आले. सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या उपचार सुरु आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *