Breaking News

वनमंत्री मुनगंटीवार यांच्या माजी स्वीय सहायकाला चोपले : नोकरीच्या नावावर लाखो उकळले

Advertisements

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एक पीडिताने लाथा बुक्यांनी मारहाण केली. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

मारहाण करत असलेल्या पीडिताकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 लाख रुपये घेतले आहेत. धवणे याने नोकरीच्या नावावर एक लाखापासून तीस लाखापर्यंत पैसे उकळल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुनगंटीवार यांनी धवणे यांना कामावरून काढले असल्याचे समजते.

Advertisements

महाराष्ट्रातील राजकारणात सुधीर मुनगंटीवार हे मोठे नाव आहे. स्वपक्षीय आणि इतर पक्षातील कार्यकर्तेही मुनगंटीवार यांचे नाव आदराने घेतात. वृक्ष लागवड, जुन्या इमारती पाडून नव्या इमारती उभे करणे, मंत्री असताना आपल्या विधानसभा क्षेत्राच्या सर्वाधिक विकास मुनगंटीवार यांनी केला. यावरून अधूनमधून मुनगंटीवार यांच्यावर टीका केली जाते. असे असतानाही चंद्रपूरच्या राजकारणात मुनगंटीवार यांचे नाव सन्मानाने घेतले जाते.

धवणे यांनी मुनगंटीवार यांचे स्वीय सहायक असताना अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले, असा आरोप केला जात आहे. पैसे दिलेल्या पीडिताने धवणे यांना गाठून मारहाण केली. धवणे यांचे नाव मुनगंटीवारांशी जोडले जात असल्याने या प्रकरणावरून विरोधक मुनगंटीवार यांना घेरण्याची शक्यता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *