Breaking News

नारायण राणेंनी घातली शिवसेनेच्या महिला नेत्याशी हुज्जत

Advertisements

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर पडले. राणेंनी त्यांना अडवलं, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले की, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला. नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना ठाकरे शिवसेना गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितले. यावर “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो” असे राणेंनी उत्तर दिले.

Advertisements

यानंतर नीलम गोऱ्हे यांनी भाषण थांबवण्याचा इशारा केला. पण राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असे म्हटले. यावर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेंकरांना विचारलं की, हे काय चाललंय ? किती वेळ चालणार? यानंतर राणेंनी आपल्या भाषणाला ब्रेक लावला.

Advertisements

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यात आले. संबंधित तैलचित्राचं अनावरण करण्यासाठी विधानभवनात सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते.त्यावेळी उपरोक्त प्रकार घडला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तारांची भाजपविरोधात भूमिका

छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून महायुतीमध्ये शिवसेनेला (शिंदे) उमेदवारी …

विधान परिषद चुनाव! महायुति के खिलाफ काँग्रेसने (MVA) उतारे उम्मीदवार

विधान परिषद चुनाव! महायुति के खिलाफ काँग्रेस(MVA) ने उतारे उम्मीदवार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   मुंबई।महाविकास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *