नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केलीय. प्रकरण असे की, उत्तमराव खराबे नागपुरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत होते. त्यांना त्यांच्या जमिनीविषयी मोजमाप करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी नागपूर तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय गाठले. यासाठी भूमी अभिलेख अधिकारी पवार व प्रयागी यांनी त्यांना मृत्यू दाखला घेऊन येण्याचे सांगितले. काही काळ आपल्यासोबत काय होत आहे, ही बाब खराबे यांच्या लक्षात आली नाही. मात्र, वारंवार मृत्यू दाखल्याची मागणी पवार करू लागले. त्यावर पैशाची मागणी होत असल्याची भावना खराबे यांची झाली.
कारेमोरे यांची तक्रार
या प्रकरणाची दखल अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी घेतली. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना पत्र लिहून सामान्यांना त्रास देणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील अधिकारी पवार व प्रयागी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.