Breaking News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरघोस मदत : अधिवेशनात घोषणा!

जळगाव,धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले.अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.अवकाळी पावसामुळे नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे अश्वासनही महाजन यांनी दिले आहे.

त्यांनी सांगितले की, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्येच या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असंही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळत नव्हती. मात्र आता राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे आणि या दोन्हीही सरकाराकडून लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विचार करतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

नितीन गडकरी ने दी ठेकेदारों को वार्निंग

नितीन गडकरी ने दी ठेकेदारों को वार्निंग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   गाजियाबाद ।केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *