Breaking News

3 तलाठी लाच घेताना अटकेत : मंडळ अधिकाऱ्यांचा पैशांसाठी तलाठ्यावर दबाव?

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महिला तलाठी लाच घेताना रंघेहाथ सापडली. तसेच एका दुसऱ्या प्रकरणात तलाठी कार्यालयात काम करणारा खासगी इसम सापडला. या घटना ताज्या असताना अकोल्यात एक तलाठी पुन्हा लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकला. त्यामुळे पैसे घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून दबाव असतो, असा सूर तलाठ्यांमध्ये दबक्या आवाजात आहे.

अकोला प्रकरण काय आहे?

शेतजमीनीचे हिस्सेवाटणी‎ करण्यासाठी चार हजारांची लाच‎ घेताना अकोल्यातील डोंगरगाव येथील‎ तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाने अटक केली. ही कारवाई‎ शुक्रवारी करण्यात आली. राजेश‎ महादेव शेळके (वय ५३, रा. संजीव‎ नगर, कोठारी वाटिका क्रमांक ६ च्या‎ मागे अकोला) असे लाचखोर‎ तलाठ्याचे नाव आहे.‎ तक्रारदार यांचे डोंगरगाव येथील‎ वडिलोपार्जित शेतजमिनीचे समान‎ हिस्से वाटणीच्या अनुषंगाने बाळापूर‎ तहसीलदार यांना अनुकूल अहवाल‎ पाठवल्याच्या मोबदल्यात तसेच‎ फेरफार नोंद करून वेगवेगळे‎ सातबारा देण्याकरीता दहा हजार‎ रूपयांच्या लाचेची मागणी करून‎ लोहारा‎ येथील तलाठी कार्यालयात राजेश‎ शेळके याने चार हजार रूपये‎ स्वीकारले.

त्याला एसीबीच्या‎ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.‎ त्यानंतर त्याच्याविरूद्ध उरळ पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी भरडला जातोय…

राज्य सरकारने विविध ठिकाणी ऑनलाईन सुविधा केल्या आहेत. महसूल विभागाच्या सेवा तर बऱ्यापैकी ऑनलाईन आहेत. तरीही तलाठी स्तरावरून फेरफार घेण्यात विलंब केला जातो. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ऑनलाईन फेरफार तलाठी लॉंगीनला आल्यानंतरही मंडळ अधिकारी तलाठ्याकडे पैशाची मागणी करतात. मंडळ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आणि नागरिकांची कामे लवकर होण्यासाठी तलाठी नागरिकांकडून पैसे घेतात, असे दिसते. परिणामी,ऑनलाईन सेवा, तरीही सामान्यांची अडवणूक होत असल्याचे दिसते.त्यामुळे तलाठी सर्वाधिक लाच घेताना अडकतोय, असे चित्र दिसते.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती : मुख्य सचिवांकडे तक्रार

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *