धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला : नंतर काय झाले… वाचा

पुण्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणार्‍या एका इसमाच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. तळेगाव ढमढेरे येथील नवनाथ नरके हे पत्नी ऊर्मिला व मुलगा विराज यांच्यासह दुचाकीवरून नातेवाइकांकडे गेले होते.

जखमी

मंगळवारी (दि. 11 एप्रिल) 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीच्या दिशेने झडप मारली. बिबट्या झडप मारत असल्याचे लक्षात येताच नवनाथ यांनी दुचाकीचा वेग वाढविल्यामुळे पत्नी व मुलाच्या पायावर बिबट्याचा पंजा लागला. दोघे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, परिसरात बिबट्याची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असे नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान …

शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार

जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *