बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर बादशाह नेहमीच गाण्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच बादशाहचा नवा अल्बम साँग रिलीज झाल्यापासून बराच वाद उफाळून आला आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भगवान शंकराच्या भक्तांनी रॅपरवर तक्रार दाखल केली आहे. गाण्यात अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या त्याच्या विरोधात अनेक लोकं बोलत आहेत. शिवभक्तांनी प्रसिद्ध रॅपरवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.
प्रकरण काय आहे?
महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावाचा अश्लिल शब्द वापरल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी गाण्यातून देवाचे नाव काढून माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास बादशाहविरोधात उज्जैनसह अन्य शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.
इंदूर येथील ‘परशुराम सेना’ या संघटनेने गायक बादशाहवर एका नवीन गाण्यात ‘भोलेनाथ’ हा शब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एमजी रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष सिंह म्हणतात, ‘परशुराम सेना’ या स्थानिक हिंदू संघटनेने बादशाहच्या गाण्याबाबत तक्रार दिली असून चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. या तक्रारीवर अद्याप एफआयआर नोंदवण्यात आली नसल्याचेही सांगितले.
सनक नावाच्या अल्बममधील हे गाणं सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला युट्युबवर १.८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात काही प्रमाणात अश्लिल शब्दांचा वापर करत उल्लेख केला आहे, असे म्हणत अनेक शिवभक्त सोशल मीडियावर चांगलेच संतापले आहेत. गाण्याच्या काही भागांवर आक्षेप नोंदवला असून या वादावर रॅपर बादशाहने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हिंदू महासभा आक्रमक
बादशहा याने भगवान शंकराचा अपमान केला आहे. त्याने तातडीने माफी मागावी अन्यथा भारत देश सोडावा,अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे.
विश्वभारत News Website