ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीवर गोळीबार : काय झाले… वाचा

ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीची बंदुकीची (एअरगन) गोळी घालून हत्या केली. हा प्रकार शनिवारी बिऊर (ता.शिराळा) येथे उघडकीस आला. वन विभागाने गुन्हा दाखल केला असून वन कर्मचारी पकडण्यासाठी गेले असता संशयितांने पलायन केले.

प्रकरण काय?

याबाबत माहिती अशी की, फोनवरून एका माकडीनीला मारल्याची बातमी वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळाली. यावरून वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, वनरक्षक विशाल दुबल, संपत देसाई यांनी घटनास्थळी भेट घेतली.

मयत माकडीनीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिथुन गुरव यांनी शवविच्छेदन केले. पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. माकडांमुळे ऊस क्षेत्राचे नुकसान होत आहे म्हणून एअर गन ने माकडीनीला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर संशयित अमित माने पळून गेला आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून उपवनसंरक्षक निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनक्षेत्रपाल महंतेश बगले हे करत आहेत.

About विश्व भारत

Check Also

गोंदियात दोन वाघाची ‘फाईट’ : एकाचा मृत्यू

गोंदिया जिल्हातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत टी-९ या वाघाचा …

५२८ हत्ती मृत्यूमुखी : वनविभाग व वन्यजीवप्रेमी गायब

किती हत्ती गमावले? मागील पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीच्या मृत्यूची आकडेवारी पावसाळी अधिवेशनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *