Breaking News

कोतवाल भरतीत गैरव्यवहार : भंडाऱ्यात दोन तहसीलदार आणि एक उपजिल्हाधिकारी निलंबित

Advertisements

भंडारा जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरतीत अनियमतीतता आढळल्याने दोन तहसीलदार आणि एक उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शासनास अहवाल दिला. स्कृत दर्शनी अनियमतीतता आढळल्याने राज्य शासनाने तीन अधिका-यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

Advertisements

यामध्ये भंडारा उपविभागीय अधिकारी, भंडारा तहसीलदार तसेच पवनी तहसीलदार यांचा समावेश आहे.

Advertisements

जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरती घेण्यात आली होती. तर भंडारा पवनी तालुक्यात या भरती प्रकरणी घोळ झाला असल्याची तक्रार तक्रारदार प्रेमानंद मेश्राम यांनी केली होती.

ज्या विद्यार्थ्याना लेखी परीक्षेत जास्त गुण असून सुध्दा त्यांची निवड न करता ज्या विद्यार्थ्याना लेखी परीक्षेत कमी गुण असून त्यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण करून माैखिक परीक्षेत जास्त गुण दिले होते असे मेश्राम यांचे तक्रार हाेती.

या प्रकरणात प्राथमिक चाैकशी अंती जिल्हाधिकारी यांनी शासनास अहवाल सादर केला. त्यानूसार राज्य शासनाने भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड,भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे व पवनीचे तहसीलदार नीलिमा रंगारी यांना निलंबित केले आहे. त्याबाबतचे आदेश शासनाने काढले आहेत. दरम्यान शासनाने पदभरती देखील रद्द केल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी वरील तिन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी भंडाऱ्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’मधील कार्यकारी अभियंता साखरवाडेना निलंबित करा : प्रेतयात्रा काढून आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि अनियमित कारभाराच्या आरोपांवरून …

उपजिल्हाधिकाऱ्याने केला वन जमीन घोटाळा : महसूल मंत्री बावनकुळे कोणती कारवाई करणार?

रायगड जिल्ह्यातील उरण येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी (महसूल) राहुल मुंडके यांनी बेकायदेशीरपणे वनांचे शेरे 7/12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *