Breaking News

तलाठी भरतीसाठी दलाल झाले सक्रिय? प्रश्न पारदर्शकतेचा

उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेली उपकरणे वापरून पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केला आहे. अनेक गावे गैरप्रकारात सहभागी असल्याचे याआधी समोर आले आहे. सूक्ष्म आकाराचा कॅमेरा, प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र परीक्षा केंद्राबाहेर पाठवणे, बाहेरून ‘मायक्रो ब्लूटूथ’द्वारे उत्तरे मागवण्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत.

वादग्रस्त भरती?

तलाठी भरती-२०१९, आरोग्य पदभरती-२०२२, म्हाडा भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती-२०२२, मुंबई पोलीस भरती-२०२३ आदी नोकर भरतीमध्ये या टोळ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. म्हाडा पदभरतीत ६० आरोपी, पिंपरी चिंचवड ५६ आरोपी, तलाठी भरती १२ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

सुरक्षेच्या कोणत्या सुविधा हव्यात?

*परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी ‘जॅमर’ बंधनकारक करण्यात यावे.

*उमेदवारांची अंग तपासणी तसेच ‘फ्रिस्किंग’बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी.

*‘बायोमेट्रिक’ आणि ‘सीसीटीव्ही’ उपकरणे आवश्यक.

About विश्व भारत

Check Also

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन 

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची मुंबईवारी

अर्थ राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी गडचिरोलीत औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *