Breaking News

अनिल देशमुख जाणार अजित पवारांसोबत? रमेश बंग, आमदार राजू कारेमोरे कुणासोबत? वाचा…!

Advertisements

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावला. या बंडात तूर्तास उघडपणे विदर्भातील चार आमदार व पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यासोबत आहेत. एकतर कधीकाळी बऱ्यापैकी शक्ती असलेल्या या पक्षाची विदर्भात आता फारशी संघटनात्मक शक्ती नसली तरी या बंडाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात अधिकच कमकुवत केले आहे.

Advertisements

गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार यांची साथ देत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार समर्थक आमदारांची यादी दिली, यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे इंद्रनील नाईकांचेही नाव आहे.

Advertisements

खरेतर विदर्भाचा विचार करता आत्राम-नाईक ही दोन्ही घराणे शरद पवार यांचे निष्ठावान मानले जातात. भविष्याचा वेध हे त्यामागचे महत्वाचे कारण मानले जाते.

अकोल्याचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी उघडपणे अजित पवार यांच्यासोबत आहेत.

पूर्व विदर्भातील भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे हे प्रफुल्ल पटेल यांचे निष्ठावान असल्याने ते तिकडेच जाणार हे उघड आहे.

नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि दोघेही शरद पवार यांचे निष्ठावान म्हणूनच ओळखले जातात. आज तरी ते पवारांसोबतच आहेत. काल देशमुख अजित पवार यांच्या बैठकीत होते, समर्थकांनी अभिनंदन देखील केले पण आज या सर्वांनी आम्ही पवार साहेबांसोबत असल्याचा घुमजाव केला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *