Breaking News

किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडीओ आणि शरद पवारांचा किस्सा!

Advertisements

किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या प्रकरणाचा निषेध केला आहे.

Advertisements

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावर त्यांची भूमिका मांडली आहे.

Advertisements

“राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तिक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तिक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल, तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तिकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

भाजप नेत्याचा सातबारा महिलेच्या नावावर… शरद पवार आव्हाडांना काय म्हणाले होते?

“मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले, जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही”, असा प्रसंग जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या प्रकरण चर्चेत आल्यानंतर सांगितला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *